Manoj Jarange  Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शत्रू आहेत का? मनोज जरांगे यांनी मोजक्या शब्दात सांगितलं, VIDEO

Manoj Jarange News : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शत्रू नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Vishal Gangurde

मुंबई : हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, हायकोर्टाने जीआर विरोधातील याचिका फेटाळून लावली. हायकोर्टाच्या निर्णयाने मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. त्यातच मनोज जरांगे यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा नारा दिलाय. मराठा आरक्षणावरील आरोप-प्रत्यारोपावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शत्रू नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी जरांगे यांनी विविध आरोपांवर भाष्य केलं. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी चूक केली, त्यावेळी आम्ही बोललो. ते आमचे शत्रू किंवा वैरी नाहीत. समाजाच्या लेकीबाळीवर हल्ला घडवून आणला. अंतरवाली सराटीत शांत बसलेल्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी घोटभर पाणी पाजायला देखील कोणी नव्हतं. त्यामुळे त्यावेळी बोललो. ज्यावेळी आरक्षण दिलं. आमचे संस्कार असे आहेत की, देणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांचा पाठिशी राहिलं पाहिजे. जे लोक देत नाहीत. त्यांच्या पाठिशी का राहायचं. ही समाजाची भूमिका असली पाहिजे, तेव्हा समाज पुढे जातो'.

शरद पवारांचे आमदार आणि खासदार तुम्हाला भेटले. त्यानंतर आंदोलन पेटल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोपावर भाष्य करताना मनोज जरांगे म्हणाले, काही कुठे नसताना आरोप करत आहेत. संविधानिक पदावर बसले आहेत. विरोधक म्हणूनही त्यांचा काही संबंध नाही. ते विनाकारण मराठा समाजाच्या विरोधात गेले. ज्या मराठ्यांनी उचलून धरलं होतं. त्याच मराठांच्या विरोधात गेले. ते विनाकारण आरोप करत आहेत'.

'लेकीबाळीवर प्राणघातक हल्ला झाला. शांततेत उपोषणाला बसताना पोलिसांनी येऊन हल्ला केला. प्राणघातक हल्ला झाला. नेते भेटायला आले. त्याला माणुसकी म्हणतात. त्याला आधार देणे म्हणतात. रक्ताच्या थारोळ्यात लोक पडले होते. भुजबळांनी मंडल कमिशन लागू केलेल्या व्यक्तीवरही संशय व्यक्त केलाय. आरक्षण लागू केलं, ते शरद पवारांनी केलं. त्यांनी ठाकरेंची शिवसेने, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले आहेत. त्यांना दुर्लक्ष केलं पाहिजे. ते ओबीसीला कलंक आहेत. आम्ही कधीही ओबीसी आणि मराठा वाद होऊ दिला नाही, असे मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

SCROLL FOR NEXT