गुन्हे शाखा अप्पर आयुक्त जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची मुदत अर्धा तासाने संपणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मराठा आंदोलनावर करणार चर्चा
कोस्टल रोडवर वाहतूक कोंडी
मराठा आंदोलनाचा मुंबईला फटका
मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा - गुणरत्न सदावर्ते
पोलिसांच्या अटीचे पालन न केल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी
सदावर्ते यांनी जरांगेंच्या विरोधात ऑनलाइन तक्रार केली.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ
नितेश राणेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलणार
मराठा आंदोलनाचा मध्य रेल्वेवर परिणाम
मध्य रेल्वेवर रेल्वे गाड्या उशिराने
गरज असल्यास प्रवास करण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील बांधव दाखल
टर्मिनल येथे वद्य वाजवले जात आहे तसेच नाचत देखील आहेत
एक मराठा लाख मराठा याची जोरात घोषणाबाजी
सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच रांगा
दमदार पावसाची इंट्री
मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे
त्यामुळे मराठा बांधव वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत
मराठा बांधव आंदोलनामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे सायन पनवेल महामार्गावरून
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विमानतळाकडे रवाना
राज्य सरकारकडून घडामोडींना वेग
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर घडामोडींना वेग
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी शिर्डी विमानतळाकडे रवाना
विशेष विमानाने जाणार मुंबईला
उपसमितीची आज तातडीची बैठक होण्याची शक्यता...
सरकारच्या भुमिकेकडे सकल मराठा समाजाचे लक्ष...
जरांगे पाटील याचं आज मुंबईमधील आझाद मैदान येथे उपोषण
लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल
मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात हजर
मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम
लोकलसेवा उशिराने सुरू
Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates: मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाल्यामुळे नवी मुंबईमध्ये नवी मुंबई पोलिसांकडून वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
वाशी रेल्वे स्टेशन वरून मराठा बांधव ना ट्रेन मधून जाण्याचा सूचना पोलिसांकडून
नवी मुंबई शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली
आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी 200 पेक्षा गाड्या गावाकडे जाताना दिसून आले आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेले आरक्षण ठाकरेंच्या काळात रद्द झाले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा १० टक्के आरक्षण दिले. महायुतीने १० टक्के आरक्षण दिले, पण मविआ सरकारमुळे टिकले नाही. ओबीसीचे आरक्षण रद्द करून आरक्षण दिले जाणार नाही. टिकणारे आरक्षण देऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कल्याण काळे यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू केल आहे . जरांगे यांना अनेक आमदार खासदारांकडून पाठिंबा मिळत आहे.अशातच जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी देखील मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन दडपल्या जाईल- काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचं मोठं वक्तव्य
दुसऱ्याचा आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण नको मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या
केंद्र सरकारने आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता स्पेशल अधिवेशन घेतलं पाहिजे व मराठ्यांचा प्रश्न निकाली काढला पाहिजे
भाजपने काँग्रेसवर आरोप करू नये भाजपचीच स्पष्ट भूमिका असली पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी
खाली आणी वर त्यांच सरकार आहे केंद्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे
- मुंबईला मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या मराठा बांधवांचा ताफा समृद्धी महामार्गावर
- मराठा आरक्षणासाठी थेट समृद्धी महामार्गावरच मराठा बांधवांचा गजर
- सोबत आणलेली शिदोरी सोडून थेट समृद्धी महामार्गावरच चटणी भाकरीचं जेवण
- मुंबईतील आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिन्नस आणि अन्य धान्य घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं
आज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झालेत. हे पाहिल्यावर सध्याच्या राजकारण्यांना मराठा समाजाच्या आंदोलनबाबत थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही. यावर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. आरक्षणाबाबत मर्यादा वाढविण्याबाबतची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी. जरांगे पाटील यांना या आंदोलनाद्वारे यश नक्कीच मिळेल, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यातील मराठा समाज जरांगे यांच्या बरोबर आहे.
मनोज जरांगेंचे आंदोलन गरजवंत मराठ्यांसाठी आहे. सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे.मात्र ज्यांना अध्यक्ष केले त्यांना वेळ नाही. ते मतदारसंघातच छोटी मोठी कामे करत फिरताय. ज्यांना अध्यक्ष केले त्यांनी गेलं पाहिजे, आंदोलकांशी बोललं पाहिजे. मात्र अजून त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर टीका केली.
लक्ष्मण हाके चालले तर एफआयआर आणि जरांगे यांना रेड कार्पेट दिले जातेय. जरांगे नावाची एक काडी होती, तिला ज्वालामुखी करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मंत्री मंडळातील काही मंत्री जबाबदार आहेत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाकेंनी केलाय.
Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates: एक भाकर समाजासाठी या ब्रीदवाक्य नुसार... नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी, चपाती, चटणी, ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येने रवाना झाले एक भाकर समाजासाठी यात ओबीसी, मुस्लिम समाजाकडूनही भाकरी, चपाती देण्यात आल्या यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
अजित पवारांचे आमदरांचा मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट. दोन्ही राष्ट्रवादीकडून जरांगेंना सपोर्ट मिळतोय, असा हल्लाबोल हाकेंनी केला.
मराठा आरक्षणा साठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आजाद मैदानीत आजपासून उपोषण सुरू झालेले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सखल मराठा समाजाच्या वतीने दसरा चौक परिसरातील लोक राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे. यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून राज्य शासनाचा निषेध ही नोंदवण्यात येत आहे.
Manoj Jarange Mumbai Morcha LIVE : आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.
या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!
बीडच्या दोन आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर हे जरांगेंच्या भेटीला
मुख्यमंत्र्यांना मागण्यांबाबत पत्र देणार असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले.
मनोज जरांगे हे सर्व समाजांसोबत आहेत असे देखील संदीप क्षीरसागर म्हणाले
तर ठाम भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले.
आमची सरकार म्हणून भूमिका सहकार्य करण्याची आहे. मुख्यमंत्री यांनी आंदोलकांना दुरावले नाही, जे नियमात बसते ते भूमिका मुख्यमंत्री घेतात, मराठा समाजाला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली, ती मागील 50 वर्षात कोणीच घेतली नाही, आमच्या सरकारने मराठा समाजाला न्याय दिला, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाड मधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी महाडच्या नातेखिंड इथं एकत्र येऊन मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुंबईच्या दिशेने कूच केले.
मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही, जर कोणी हे न्यायालयाच्या हवाले देत असतील हे सरकारचं काम आहे. हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम मुख्यमंत्री यांनी आज सांगितला आहे. अप्रत्यक्षपणे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे, एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यांना राजकारण काय दिसत आहे.संजय राऊत
संपूर्ण देशात आंदोलन सुरू होते, EWS निर्णयानंतर ओबीसबाहेर असलेल्यांना आरक्षण मिळालं, 10 टक्के आरक्षण आणि सारथी माध्यमातून मराठा समाजाला फायदा होत आहे. ओबीसी आरक्षण न जाता मराठ्यांना आरक्षण देण्याची भाजपची भूमिका आहे. कॉंग्रेस ओबीसीतून आरक्षण द्या म्हणत आहे का? ही भूमिका स्पष्ट करावी.. मराठा समाजाला 10 टक्के दिले, यात आणखी काय देता येईल याचा प्रयत्न सुरू आहे.. पुढच्या काळात मराठा समाजाला न्याय आमचे सरकार न्याय देईल...चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज मराठवाड्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करताय. त्यांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्याचा निर्णय अडतीया असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलाय. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून निघायचे नाही. सरकारने आंदोलनाला मुदवाढ द्यावी. त्यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे, आजही अर्ज करूयात. समजासाठी शेवटपर्यंत लढणार आहे. शेवटपर्यंत मी मॅनेज होणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून आऱक्षण मिळण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : शेवटी मरण येईल, मी भोगायला तयार आहे. तुम्हाला रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिली आहे. पाच रूपये तिकीट आहे. संध्याकाळी रेल्वेतच झोपायचे. पाऊस अचानक येतो अन् अचानक जातो. त्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे.
काहीही झाले तरी समजाला किंमत द्या, समजाने विश्वासाने ५०० किमी पाठवलेय. तुमच्या डोक्यावर फक्त विजय हवाच. संयमाने लढा द्यायचा आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा..
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : समजासाठी वीर मरण द्यायला तयार आहे. पण मागे हटणार नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे तुम्ही वागू नका. आपल्या लेकाराला मोठं करायचं आहे. एखादा राजकीय कार्यकर्ता हट्ट धरेल, मला तिकडेच गाडी न्यायची. पण सरकार सहाकर्य करत तोपर्यंत आपणही सहकार्य करायचे. दारू पिऊन कुणीही गाड्या कुठेही घालू नका. समजाला मान खाली घालण्यासारखे वागू नका.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : सरकार पुढचेही सहाकार्य करेल, सरकारच्या हातात आंदोलनाला परवानगी देण्याचे आहे. आपण पुन्हा अर्ज करू. आपण समजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय, गडबड गोंधळात समाजाचे वाटोळ करू नका. आपण शिकलो नाही, दुसऱ्याच्या बुद्धीने चाललो म्हणून ७० वर्षे नेत्यांनी आपलं वाटोळं केले.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : आपल्या रस्त्यावरील गाड्या काढायची आहे, पार्किंगमध्ये पोलीस सांगतील तिथे लावायची. स्वत तुम्ही स्वंयसेवक म्हणून काम करायची. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. उपोषणाला बसल्यानंतर मला बोलता येणार नाही. पोलीस नाराज झाले नाही पाहिजे, वाहतूक कोंडी झाली, हे ऐकायला आलं नाही पाहिजे. आपण आझाद मैदानात यायचे होते आलो.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : कुणी जाळपोळ दडगफेक करायची नाही. सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्राने सहकार्य नाही केले, तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची.
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : सरकार सहकार्य नव्हते, म्हणून मराठे मुंबईत आले. सरकारने सहाकार्य केले. त्यांनी परवानगी दिली आहे. त्याबाबत सरकारचे कौतुकही केले. सरकारने सहाकार्य केले, त्यामुळे तुम्हालाही सहकार्य करायचे आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला पर्यत्न करायचा. आपलं मुंबईत यायचे ठरलं होतं. आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण इथे आलोय. आपलं उपोषण सुरू आहे. आता तुमची काय जबाबदारी आहे. सरकार आपल्याला सहाकार्य करणार नव्हते, त्यामुळे मराठा समाज घराघरातून निघाला होता.
Manoj Jarange Patil Protest Live Updates : माझं उपोषण सुरु झालं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. सकाळी १० वाजल्यापासून हे उपोषण सुरु झालं आहे.आपलं आमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय. गडबड गोंधळ करू नका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : आझाद मैदानावर मराठ्यांचा जल्लोष, घोषणाबाजी सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केलेय. सर्वांनी शांततेत राहावे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचेय, तुम्ही शांत राहा असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मराठा बांधव मुंबईला निघाले आहेत. आज सकाळपासून हातात भगवे झेंडे घेऊन तसेच डोक्यावर भगवी टोपी परिधान करून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून 50% टिकणार आरक्षण मिळायलाच हवे या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागणीला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेला निघाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
जरांगेंचा ताफा कर्नाक पूल परिसरात पोहचला आहे. थोड्याच वेळात ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत. आझाद मैदानात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. जिकडे तिकडे भगवं वादळ घोंगावताना दिसत आहे. सीएसएमटी स्थानकातही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी पुण्यातून हजारो बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनासाठी पुण्यातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. पुण्यातील कात्रजमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधव रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. पुण्यामधून देखील अनेक मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. फ्री वे पासून पायी चालत जाण्याच्या सूचना पोलिसांकडून आंदोलकांना देण्यात आल्या आहेत. फ्री वेपासून आझाद मैदानाकडे मोजक्याच गाड्याने जाण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर अनेक मराठा आंदोलक चालत आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सचूना देण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. त्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गर्दी अधिक झाल्यानं वाहतूक मंदावली आहे. पायी चालणारे मराठेही रस्त्यावर चालत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. पार्किंगमध्ये वाहने लावून मराठे आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. आझाद मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
राज्यभरातून शेकडो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत. त्यामुळे सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागत प्रवास शक्यतो टाळवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा कार्यकर्ते मुंबईकडे कूच करत आहेत. राज्यभरातून येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यासह राज्याचे इतर भागातून येणाऱ्या मराठा आंदोलकासाठी धाराशिवच्या तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या मुंबईतील नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये निवासाची आणि जेवणाची तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली.
मुंबईमधील आझाद मैदानावर भगवं वादळ आले आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आंदोलानच्या ठिकाणी पोहचणार आहेत. आझाद मैदानावर मराठा आंदोलकांकडून जरांगेंवरील गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. मागे हटला नाही हटणार नाही, नेता लय खंबीर , तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर अशा गाण्यांनी सुरुवात झालीय. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानावर दाखल झालेत.
थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार आहेत. त्यांचे जंगी स्वागत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. ९ वाजता मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसणार आहेत.
- मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून मराठा बांधवांचं मुंबईकडे कूच
- शेकडो वाहनांच्या माध्यमातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना
- नाशिकचं ग्रामदैवत कालिका मातेचं दर्शन घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना
- मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे
- शेकडो वाहनं, रेल्वेच्या माध्यमातून मराठा बांधव मुंबईकडे
- मुंबईतील आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातून रसद पुरवणार
आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात आझाद मैदानावर ते दाखल होणार आहेत. राज्यभरातील लाखो मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.