Chandrakant Patil vs Manoj Jarange Saam tv news
मुंबई/पुणे

'..त्यांचा गेम वाजवलाच म्हणून समजा' मंत्री चंद्रकांत पाटलांना थेट इशारा, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

Chandrakant Patil vs Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू. तिसऱ्या दिवशी अन्न-पाण्याचा त्याग करण्याचा निर्णय. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर जरांगे पाटलांचा घणाघात

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू

  • तिसऱ्या दिवशी अन्न-पाण्याचा त्याग करण्याचा निर्णय

  • चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर जरांगे पाटलांचा घणाघात

  • "जास्त बोलले तर गेम वाजवला म्हणून समजा" असा जरांगे पाटलांचा थेट इशारा

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदेत अन्न-पाण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. 'राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलंय', असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर जरांगे पाटील यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यात आली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांना सांगा, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून आम्ही चांगलं बोललो. पण आता वचवच करू नये. त्यांना काय अक्कल आहे? त्यामुळेच त्यांना काढून टाकलंय', असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. 'चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये.', असंही जरांगे पाटील म्हणाले.

'चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडताळणी रोखली होती. कोल्हापूर म्हणजे आमच्याच राजघराण्याच्या कचाट्यात ते राहातात,'असं जरांगे पाटील म्हणाले. शेवटी जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला. 'पाटील यांनी जास्त बोलू नये. शांत राहावे. जास्त बोलले तर, त्यांचा गेम वाजवला म्हणून समजा', असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली आहे. 'सर्व प्रश्न सोडवले. मात्र, तरीही आता केवळ राजकीय आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुंबईत आंदोलनाला सुरूवात केली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नये', असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'कोण कुठे चाललंय? कोणाच्या सोंगट्या कोणाच्या...'; राज ठाकरेंचा नाशिकमध्ये घणाघात|VIDEO

झाडं छाटायच्या आधी भाजपने पक्षातले कार्यकर्ते छाटले; राज ठाकरे नाशिकमधून गरजले

नाशिक दत्तक घेतो बोलल्यानंतर हा बाप फिरकलाच नाही; नाशिकमध्ये राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: भाजप पक्षाला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागतात - राज ठाकरे

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT