Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा नवा डाव; सरकार स्थापनेनंतर उगारणार उपोषणास्त्र

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी सरकार इशारा दिलाय.... सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असल्याचा घणाघात त्यांनी केलाय... तर या पुढचं आंदोलन कुठे करणार याचीही घोषणा जरांगेंनी केली..जरांगेंनी सरकार स्थापने आधीच काय इशारा दिलाय...पाहूया...

Tanmay Tillu

मनोज जरागे पाटील हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जरांगेंनी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर तुळजाभवानीच्या मंदिरातूनच जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा नवा डाव आखलाय. घराघरात आदोलन करण्याची हाक दिली असून मुंबईतही ध़डकणार असल्याचा इशारा जरांगेनी दिलाय. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच जरांगे उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली होती. मात्र ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर आता पुन्हा जरांगे उपोषणाची भाषा करतायत...महायुती सरकारची स्थापना होताच जरांगे पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्यानं राज्यात पुन्हा आरक्षणाचा संघर्ष सुरू होणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या 21 दिवस अगोदर शरीर देतंय संकेत; ही 4 लक्षणं वेळीच ओळखा

Shravan Dress Colors: श्रावणात 'या' रंगाचे कपडे चुकूनही घालू नका; नाहीतर होतील हे परिणाम

Agra Fort : भव्य तटबंदी, गुप्त भुयारे अन् इतिहासाची रहस्ये, वाचा आग्रा किल्ल्याच्या खास गोष्टी

Exam Tips : अभ्यास करूनही परीक्षेत उत्तरं आठवत नाहीत? ‘ही’ ६ कारणं ठरू शकतात जबाबदार

श्रावणात दाढी आणि केस कापू नये असं का म्हणतात? जाणून घ्या 5 मुख्य कारणे

SCROLL FOR NEXT