Devendra Fadnavis On Manoj Jarange x
मुंबई/पुणे

Manoj Jarange Morcha: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, मुंबईच्या वेशीवर पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं आरक्षणाबाबत मोठं आश्वासन

Devendra Fadnavis On Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा काही तासांमध्येच मुंबईमध्ये पोहचणार आहे. हा मोर्चा मुंबईत पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत मोठं आश्वासन दिले.

Priya More

Summary -

  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने.

  • मोठ्या संख्येने मराठा बांधवांचा सहभाग.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान – कुणावरही अन्याय होणार नाही.

  • जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेृत्वाखाली मराठा बांधव मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्यने राज्यभरातील मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जुन्नरमधून मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मुंबईच्या वेशीपर्यंत मनोज जरांगे पाटील पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आरक्षणावरून कुणावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजाने लक्षात घ्यावे की त्याचे प्रश्न आम्हीच सोडवले आहेत. आमच्याच सरकारने त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. यापुढेही आम्हीच त्यांचे प्रश्न सोडवणार आहोत. मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच मार्गी लावले आहेत. आरक्षणाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही कारण ईडब्ल्यूएसमुळे अनेक प्रश्न सुटलेले आहे. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलंय आणि ते कोर्टातही टिकलंय.'

मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले की, 'सगळ्यांना आपली मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीने जेवढी आंदोलनं होतील त्याला आमचा ना नाही. त्याला आम्ही सामोरे जाऊ. त्यावर चर्चा करू आणि योग्य मार्ग काढू.' दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत. उपोषणासाठी कोणत्याही अटी-शर्थी लावू नये असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

Crime: भयंकर! अंघोळ करणाऱ्या बायकोवर चाकूने सपासप वार, जीव घेतल्यानंतर तरुणाने फेसबुकवर लाईव्ह केलं अन्...

SCROLL FOR NEXT