Manoj Jarange Patil Saam TV News
मुंबई/पुणे

ManoJ Jarange Patil : एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगेंची आंदोलकांना साद

ManoJ Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पुन्हा एका दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर आज आझाद मैदानात मनोज जरांगे यांनी आंदोलकांना साद घातली.

Vishal Gangurde

जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकारण तापलं

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला एका दिवसाची मुदतवाढ

मनोज जरांगेंकडून आंदोलकांना भावनिक साद

मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी मराठा आंदोलकांनी लावून धरली आहे. याच मागणीसाठी जरांगे उद्यापासून पाणी पिणे देखील सोडणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. आझाद मैदानातील आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांनी आज रविवारी रात्री आझाद मैदानातून आंदोलकांना भावनिक साद घातली आहे. एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल, अशा शब्दात जरांगे यांनी मराठा बाधवांना साद घातली.

मनोज जरांगे यांच्या भाषणातील मुद्दे

आम्ही खेड्यातले आहेत,पण आम्हाला अक्कल आहे. त्यामुळे एवढा लढा लढतोय ना

शिंदे समितीचं काम नोंदी शोधणं आहे. प्रमाणपत्र देणं त्यांच्या हातात आहे. संबंधित मंत्रालयाने त्यांचे अधिकार काढले तर तेच मंत्रालय प्रमाणपत्र देते.

शिंदे समितीचं काम म्हणजे नोंदी शोधून अहवाल तयार करणे. त्यांनी तीन खंड बनवून सरकारला दिले. आता पुढची प्रक्रिया म्हणजे सरकारने अंमलबजावणी केले.

मराठा समाजाच्या पोरांना सांगतोय, कोणताही नेता आला. भाजपविरोधी पक्षाचा असेल, त्याला त्रास देऊ नका.

पत्रकारानं सांगितलं की, तुम्ही गोंधळ घातला, पण तुम्ही गोंधळ घालणार असाल तर कोण येणार नाही.

सन्मान करा, आरक्षण भेटत नाही, तेव्हा आपण काय करायचं ते कोणत्याही नेत्याला माघारी बोलू नका.

गोंधळ घालणारे कोण आहेत, ते बघावे लागणार आहे.

सरकारने पाठवलेले आहेत का, बघायला लागेल माझे पोरं असे करणार नाहीत.

थोडं सावध राहा, बाकी मी सगळं बघतो.

पोरांना सांगणे आहे, रस्त्यात गाड्या लावू नका.

शिवी देऊन समुद्रात जाऊ नका, असा कार्यकर्त्यांना समान

समुद्राच्या पाण्यात गेलेलं, एक पण दिसलं नाही पाहिजे.

जिंकायचे आहे, आपल्याला एक एक माणूस म्हत्वाचा आहे. ते पाणी चांगले नाही. त्यात उतरू नका.

तोडगा सोपा आहे. सरसकट शब्द तुम्ही लावू नका. तुमचं म्हणणे आहे की, उपसमितीची दोनवेळा बैठक झाली. मला माहीत नाही. पण सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे.

तुमच्याकडे ५८ लाखाचा नोंदीचा आधार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचे सापडले नाही, त्यांची पोटजात उपजात वापरून आरक्षण द्या ना, सरसकट म्हणू नका...

५८ लाखांच्या नोंदी आहेत, त्याऐवजी जीआर काढा. तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचे असेल.

वॅलिड करायला पोटजात आणि उपजात काढायला. ज्याला घ्यायचे आहे, ते घेईल. ज्याला नाही घ्यायचा, ते नाही घेणार. सरसकट बोलण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Tourism: सोलापूरजवळ वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन; लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं

Maratha Reservation Controversy: हा जीआर फक्त कागद; मराठा आरक्षणावर विनोद पाटील यांची जोरदार टीका|VIDEO

Shocking : धक्कादायक! गुंडांनी चोर समजून बंधक ठेवलं; ३ दिवस अमानुष छळ, गुप्तांगात पेट्रोल ओतलं

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

Bus Accident : शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बसउलटली; ३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर

SCROLL FOR NEXT