मनीषने देशहिताच काम केलंय; कृपया राजकारण करू नका ​-भानुशाली कुटुंबीयांच आवाह SaamTV
मुंबई/पुणे

मनीषने देशहिताच काम केलंय; कृपया राजकारण करू नका - भानुशाली कुटुंबीयांच आवाहन

प्रदीप भणगे

डोंबिवली : एनसीबीने NCB क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी चे नेते  नवाब मलिक Navab Malik यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. NCB कारवाई दरम्यान मनीष भानुषाली हे व्हिडिओ मध्ये एकाला पकडून घेऊन जाताना दिसत आहे भाजपचा कार्यकर्त्याला हा अधिकार कुणी दिला असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. (Manish has worked in the interest of the country)

हे देखील पहा -

मनीष वरती होत असलेल्या आरोपांबाबत त्याचा भाऊ महेंद्र मनीषची Manish Mother आई भगवती यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपा बद्दल आम्हाला माहिती नव्हतं ते टीव्हीवरती बघीतल्यानंतर आम्हाला समजलं असल्याच सांगितलं. शिवाय मनीषने आम्हाला सांगितलं होतं की 'मी चांगलं काम केलं आहे.' तीन दिवसांपूर्वी त्याच्याशी बोलणं झालं होतं असं देखील मनीषच्या घरच्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान त्याने काही काही चुकीचं काम केलं नाही ,त्याने देशहिताच काम केलंय ,कृपया राजकारण करू नये असं आवाहन त्यांच्या कुटूंबाने केलं आहे. एकीकडे मनीषच्या कुटुंबियांनी हे आवाहन केलं असलं तरी राष्ट्रवादीसह NCP शिवसेनेने Shivsena देखील आता मनीष विरोधात आवाज उठवला असून मनीष हा भाजपचा माणूस असल्याचही बोललं जात आहे.

भाजपा बॉलिवूडला बदनाम करतय...

दरम्यान या ड्रग्ज पार्टी आणि अंमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केलेला शाहरुख खानचा Shahrukh Khan मुलगा आर्यन खान Aryan Khan याच्या बाबतीत बोलताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवरती आरोप केला आहे. भाजप आणि एनसीबीनी BJP And NCB मिळून ही कारवाई केली असून भाजपाचा बॉलिवूडला Bollywood बदनाम करण्याचा प्लॅन आहे असं वक्तव्य मलिक यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT