alphonso mangoes arrives from ratnagiri at apmc market navi mumbai saam tv
मुंबई/पुणे

APMC Market Vashi : आंबा खवय्यांसाठी खुशखबर, एपीएमसीत आंब्याच्या पेट्या दाखल; जाणून घ्या दर

पहिली आंब्याची पेटी आल्याने एपीएमसीत आनंदाचे वातावरण आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

आंब्याचे मुबलक उत्पादन झाले आहे. लवकरच आंब्याची आवक वाढेल. आगामी काळात ग्राहकांना मुबलक दरात आंबा उपलब्ध हाेईल अशी भावना एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) फळ बाजारातील व्यापारी अमाेल शिंदे यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)

यावर्षीचा पहिला आंबा एपीएमसी फळ बाजारात नुकताच दाखल झाला. व्यापारी अमोल शिंदे यांच्या गाळ्यावर रत्नागिरीतून आंब्याच्या दोन पेट्या एपीएमसीत दाखल झाल्यात. या आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली. दरम्यान आंब्याच्या पेटीला 10 ते 15 हजर रुपये इतका दर आहे. एका पेटीत साधारणत: चार ते पाच डझन आंबे असतात.

अमोल शिंदे यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना आंबे खवय्यांसाठी खुशखबर दिली. ते म्हणाले यंदा आंब्याचे मुबलक उत्पादन झाले आहे. लवकरच आंब्याची आवक वाढणार आहे. ग्राहकांना आंबा मुबलक दरात उपलब्ध हाेईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT