Eknath Khadase- Mandakini Khadase Saam TV
मुंबई/पुणे

Pune: भूखंड घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना न्यायालयाकडून अंतरिम दिलासा कायम

मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली.

सुरज सावंत

पुणे: पुणे भूखंड कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. पुणे भूखंड कथित घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आधीच दिलासा मिळाला होता.

पुणे एमआयडीसी (Pune MIDC) जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंदाकिनी खडसे यांच्या अटक पूर्व जामीनावर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली.

दरम्यान पुण्यामधील भोसरी जमीन घोटाळा (pune bhosari land case) प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या Eknath Khadse पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे Mandakini Khadse यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तसेच त्यांच्याविरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणी मंदाकिनी खडसेंना मुंबई हायकोर्टाचा mumbai high court दिलासा मिळाला होता. पुण्यामधील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाने दिलासा दिला होता. या प्रकरणी तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले होते. तसेच तपास यंत्रणेला या तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश देखील खडसेंना देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT