Andheri Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, खोटा बनाव रचून पोलिसांनाही फसवलं; पण...

Husband try to killed wife : अंधेरी पोलिसांनी आरोपी अजय परमार विरोधात ३०७, ४९८ (अ),५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

नवऱ्याने बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. व्यसनी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या महिलेला पतीने जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित महिला यात थोडक्यात बचावली आहे. यानंतर आरोपी पतीने पोलिसांना देखील फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हुशारीमुळे आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर पत्नीला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला. यात त्याचा हात देखील भाजल्याचे सांगितले. महिलेने जबाबातही प्रथम स्टोव्हच्या स्फोटामुळे भाजल्याचे सांगितले होते.. दरम्यान पीडित महिलेवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू असताना घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी अंधेरी पोलीस गेले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी कुठेही स्टोव्ह आढळला नाही, त्यामुळे त्यांना संशय आला. पोलिसांनी तहसीलदार यांच्याकडे महिलेचा जबाब नोंदवण्याची परवानगी केली आणि पुन्हा महिलेचा जबाब नोंदवला.

त्यानंतर महिलेने व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीची पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असल्याच्या रागातून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपी अजय परमार विरोधात ३०७, ४९८ (अ),५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

SCROLL FOR NEXT