Mumbai Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai : गर्लफ्रेंडच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रायव्हेट पार्टला इजा करत नराधमानं व्हिडिओ काढला; मुंबई हादरली

Mumbai Crime News: प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकण्याचा प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागात घडला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

संजय गडदे, साम टीव्ही

राज्यभरातून महिला अत्याचार, लैंगिक छळाच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना मुंबईतील एका संतापजनक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकण्याचा प्रकार घडला आहे. कहर म्हणजे नराधमाने अत्याचार करत व्हिडिओ देखील शूट केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या प्रेयसीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागात १० वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या प्रियकराने वारंवार अत्याचार केला आहे. घरात कुणीही नसताना आरोपी तिच्या घरी जायचा. नंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करायचा. चार ते पाच वेळा अत्याचार करून त्याने चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घातलं.

'तुझ्या आईला जीवे मारून टाकीन', अशी धमकी देत नराधमाने चिमुकलीचे लचके तोडले. यामुळे पीडित मुलगी भीतीच्या सावटाखाली जगत होती. अखेर त्रास असह्य्य झाल्यामुळे तिने आपल्या आईला आपबिती सांगितली. हा प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपीने प्रेयसीवर टोकदार वस्तूने हल्ला केला.

या घटनेनंतर महिलेनं मेघेवाडी पोलीस ठाण्यात घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली असून, आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली. मोबाईलमधील अनेक क्लिप डिलीट केलेल्या आढळल्या. पोलिसांनी मोबाईल तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: संजय दत्त लवकरच या ५ चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

Maharashtra Politics: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?VIDEO

Chapati Nachos : चपातीपासून घरीच करा कुरकुरीत नाचोस, नाश्त्यासाठी ५ मिनिटांत बनवा रेसिपी

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड! शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग,'या' ठिकाणी एकदा तरी भेट द्याच

Maharashtra Live News Update: - रायगडमधली परिस्थिती सामान्य झाली आहे

SCROLL FOR NEXT