pune latest news Saam tv
मुंबई/पुणे

११ वर्षांआधी केदारनाथमधील पुरात साथ सुटली, कुटुंबीयांकडून प्रतिमात्मक अंत्यसंस्कार; अचानक मनोरुग्णालयातून फोन खणखणला अन्...

missing man found alive : केदारनाथमधील पुरात साथ सुटली. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी बेपत्ता भावाचा शोध लागला. पुण्यातून मनोरुग्णालयात आढळून आला.

Vishal Gangurde

२०१५ च्या केदारनाथ पुरात बेपत्ता झालेला शिवम ११ वर्षांनी पुण्यात आढळला.

कुटुंबीयांनी त्याचे मृत झाल्याचे समजून प्रतिकात्मक अंत्यसंस्कारही केले होते

एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला मानसिक आजार असल्याचे स्पष्ट झालं होतं

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: एखाद्या चित्रपटात एखादा व्यक्ती मृत पावल्यावर एखाद्या घटनेत तो जिवंत असल्याचं जसं पाहायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय. २०१५ साली केदारनाथमध्ये आलेल्या पुरात अनेक जणांचं मृत्यू झालं होता. अनेक जण वाहून गेले होते. या घटनेत जे वाहून गेले होते त्या नावांमध्ये शिवम देखील एक होता. काही दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शिवमची माहिती मिळाली नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी देखील तो मृत झाल्याचं समजत त्याचं प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केलं. पण काही वर्षानंतर हा शिवम पुण्यात आढळून आलाय. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयकडून प्रथमच बंदी मनोरुग्नाचे कौटुंबीक पुनर्वसन करण्यात आलं आहे.

२०१५ मध्ये केदारनाथ येथे आलेल्या पुरात अनेक जणांचं मृत्यू झालं होता. अनेक जण बेपत्ता झाले होते. या घटनेत जे बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये शिवम देखील एक होता. काही दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शिवमची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी तो मृत झाल्याचं समजत त्याचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले.

काही वर्षांनी राज्यातील संभाजीनगर एका चोरीच्या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्या आरोपींनी शिवमचं देखील नाव घेतलं. या प्रकरणी आरोपी शिवमला न्यायालयात हजर केल्यावर त्याला मानसिक आजार असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याला पुण्यातील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर दोन वर्ष उपचार आणि कायदेशीर लढ्यानंतर त्याचं कौटुंबीक पुनर्वसन करण्यात आलं आहे.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी माहिती दिली की, प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे येथे प्रथमच बंदी मनोरुग्ण अनोळखी शिवम नावाचा बंदी संभाजी नगर येथून २७ ऑक्टोबर २०२१ साली मानसिक आजरावरील उपचारासाठी दाखल झाल होता. या बंदी मनोरुग्ण यांच्यावर भारतीय दंड सहिता अंतर्गत २९५ हा गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यानुसार धार्मिक भावना दुखावने या प्रकारचा गुन्हा प्रकार आहे. हा रुग्ण उपचाराबरोबर गुन्ह्यानुसार शिक्षा पण भोगत होता'.

रुग्ण शिवम हा पहाड़ी हिंदी भाषिक होता. त्यांच्या सोबत बोलताना भाषेची अडचण येत होती. तेव्हा रोहिणी भोसले यांनी त्याना त्यांच्या शिक्षण या विषयात माहिती विचारता त्याने शिक्षण हे प्रेम विद्यालय, रूरकी गाव, हरिद्वार असं त्याने तुकड्यामध्ये माहिती दिली. त्यानुसार रोहिणी भोसले यांनी गुगल सर्च इंजिनच्या मदतीने गावाचा शोध लावला. त्याच्या गावातील पोलीस स्टेशनचा नंबर आणि पत्ता मिळाला. रोहिणी भोसले यांनी संबधित पोलीस स्टेशन येथे फोन, व्हिडिओ कॉलद्वारे आणि पत्र पाठवून संपर्क साधला. त्यानंतर दोन दिवसात रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यातील बैठक निष्फळ

धक्कादायक! भरधाव कारने ६ जणांना उडवलं, रस्त्यावरील श्वानालाही चिरडलं

Shocking: राजकारणात खळबळ! बड्या राजकीय नेत्याची हत्या, छातीत झाडल्या ३ गोळ्या

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

Pineapple Benefits: हिवाळ्यात अननस खाल्ल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT