पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुण्यामध्ये (Pune) पुन्हा एकदा सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुण्यामध्ये (Pune) पुन्हा एकदा सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी, सासू, सासरे आणि मेहुण्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून धनकवडी परिसरात राहणाऱ्या एक व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील गोखले नगर भागात ही एका व्यक्तीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

धनकवडी येथील तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली, त्यात पत्नी, सासू सासरा आणि मेहुण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. शरद नरेंद्र भोसले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पत्नी, प्रियंका सासू नंदा, सासरा शंकर शिंदे आणि मेहुणा मनीष उर्फ गणेश शंकर शिंदे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भोसले (वय 58, रा. धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सासू सासरे बायकोला नांदू देत नाहीत, तिला भडकवतात. म्हणून मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिट्ठीत केलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदिवलीत भीषण आग, सात जण गंभीर जखमी

१७ मुलींचा आश्रमात विनयभंग केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार

Shocking: मुस्लिम दाजी नको म्हणून भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला संपवले, घरी बोलावून केली हत्या

Liver Disease Symptoms: ही ७ लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा, अन्यथा लिव्हर खराब झाले म्हणूनच समजा, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Nilesh Sable-Bhau Kadam : मनोरंजनाचा डबल बोनस; निलेश साबळे-भाऊ कदम दिवाळी गाजवणार, कुठे अन् कशी पाहा?

SCROLL FOR NEXT