Husband wife clash  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : भयंकर! छातीवर बसून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला; बॉयफ्रेंडचं कृत्य, बायको निर्दयतेने बघत राहिली

Husband wife clash : छातीवर बसून बायकोच्या बॉयफ्रेंडने नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

बीरप्पा पुजारी झोपले असताना त्याच्यावर पत्नीच्या प्रियकराने हल्ला

छातीवर बसून गळा दाबला, तसेच प्रायव्हेट पार्टवर लाठ्यांनी हल्ला

पत्नीकडून प्रियकराला हत्या करण्यासाठी उत्तेजन

घरमालकाने बीरप्पाचा जीव वाचवला

घरात नवरा एका खोलीत झोपला होता. घरात गाढ झोपलेल्या नवऱ्याची अचानक झोपमोड झाली. झोपेत असलेल्या नवऱ्याच्या छातीवर एक जण बसला होता. छातीवर बसलेला व्यक्ती त्याचा गळा आवळत होता. खरंतर बायकोचा बॉयफ्रेंड त्याचा गळा आवळत होता. खरंतर बायकोच बॉयफ्रेंडच्या साथीने नवऱ्याला संपवण्याचा प्रकार सुरु होता. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'न्यूज १८'च्या वृत्तानुसार, कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी गावातील संपूर्ण प्रकरण आहे. १ सप्टेंबर रोजी अक्कमहादेवीनगर येथील घरात बीरप्पा पुजारी नावाचा व्यक्ती झोपला होता. अचानक झोपमोड झाल्यानंतर कळाले की, त्याच्या छातीवर एक जण बसला होता. छातीवर बसून बीरप्पाच्या बायकोचा बॉयफ्रेंड गळा आवळत होता. बॉयफ्रेंड हा छातीवर बसून प्रायव्हेट पार्टवरही लाठीहल्ला करत होता.

बीरप्पाने डोळे उघडल्यानंतर घरातील लाइट बंद होती. याच खोलीत बीरप्पाची पत्नी बॉयफ्रेंडला नवऱ्याची हत्या करण्यासाठी प्रोत्साहन देत होती. 'त्याला संपवून टाक. सोडू नको, असं सुनंदा बॉयफ्रेंडला सांगत होती.

घर मालकाने वाचवला बीरप्पाचा जीव

घर मालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी आरडोओरड ऐकल्यावर घरात पोहोचले. त्यांनी बीरप्पाच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी बीरप्पाचा मुलगा राकेशने रडत रडत दरवाजा उघडला. त्यावेळी सुनंदा बाहेर येऊन घर मालकाला घरात येण्यापासून रोखू लागली. मात्र, घर मालक तिला धक्का देऊन घरात शिरला. त्यावेळी बॉयफ्रेंड सिद्दप्पा हा बीरप्पाचा गळा आवळत होता.

अनैतिक संबंधातून हत्येचा प्रयत्न

बीरप्पाच्या पत्नीचे सिद्दप्पासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायचे. बीरप्पाच्या हत्येचा प्रयत्न सुरु असताना सिद्दप्पा घरात होता. त्याने चेहरा कपड्याने झाकला होता. घर मालक घरात आल्यानंतर हल्लेखोर सिद्दप्पा बीरप्पाला धमकी देऊन पळाला. या हल्ल्यात बीरप्पा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीरप्पावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका थांबल्या तरी कागल मधील आघाडी थांबणार नाही - हसन मुश्रीफ

उमेदवारी अर्ज घातला...,भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं मराठी तुम्ही एकदा ऐकाच | VIDEO

छत्रपती संभाजी नगर - पुणे महामार्गावर ६ पदरी रस्ता होणार; ग्रीनफिल्ड रोड समृद्धी महामार्गाला जोडणार

Cabbage Recipe : कोबीची भाजी आवडत नाही, मग झटपट बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Aho Meaning: लग्नानंतर बायको "अहो" का म्हणते? शब्दाचा अर्थ वाचून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT