Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याणमध्ये नेमकं चाललंय काय?, पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाच्या डोक्याला घेतला चावा, घटनेचा व्हिडिओ आला समोर!

Latest Crime News: याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती महेश मानेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kalyan News: पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन पोलिस (Kalyan Police) कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या विजयनगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती महेश मानेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलिसांकडून (Kolasewadi Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात महेश माने हा तरुण आपल्या पत्नीसह राहतो. रविवारी रात्रीच्या सुमारास महेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद खूपच विकोपाला गेला.

याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नागेशनाथ घुगे आणि हवालदार सांगळे हे दोघे घटनास्थळी दाखल पोहचले. त्यांनी महेश आणि त्याच्या पत्नीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलिसांनाच महेश मानेने धक्काबुक्की करत शिवीगाळ केला. महेश ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिस कर्मचारी नागेशनाथ घुगे यांच्या हाताला आणि डोक्याला चावा घेतला.

यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी आणखी पोलिसांना बोलावून घेत महेशला ताब्यात घेतले. त्यानंतर महेशविरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

Maharashtra Live News Update : बड्या आमदाराच्या वाहनावर कारवाई, अकोल्यात खळबळ

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

Mumbai : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी काँग्रेसचा नेता अडचणीत; तब्बल २० वर्षांनी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT