Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Crime News: धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण; वाशिंदमधील खळबळजनक घटना

Vasind Crime News: महिला डब्यात चढताना तरुणास रोखल्याने त्याने महिला होमगार्डला मारहाण केली आहे.

Ruchika Jadhav

Crime News:

वाशिंद आसनगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण करण्यात आली आहे. महिलांच्या डब्यात चढताना तरुणास रोखल्याने त्याने महिला होमगार्डला मारहाण केली आहे.

गुरूवारी कल्याण रेल्वे स्थानकातील लोकल ट्रेनवर पेट्रोलींग करणाऱ्या होमगार्ड महिला कसारा लोकलने जात होत्या. त्यावेळी वाशिंद ते आसनगाव या स्थानकादरम्यान एक तरुण महिलांच्या डब्ब्यात चढण्याचा प्रयत्न करत होता. होमगार्ड महिलेने त्याला रोखले असता राग अनावर होऊन त्याने थेट महिलेलाच मारहणार करण्यास सुरूवात केली.

मारहण केल्यानंतर हा तरुण पसार झाला होता. मात्र रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. तसेच आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्यात.

4 संशयित आतंकवादी साधूच्या वेषात

वाशिंद आसनगावमधील ही घटना ताजी असतानाच पालघरमधूनही एक खळबळजनक घटना समोर आलीये. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये 4 संशयित आतंकवादी साधूच्या वेषात असल्याचं ट्वीट एका प्रवाशाने रेल्वे हेल्पलाइनवर केलं होतं. यामुळे पालघर स्थानकात जयपूर बांद्रा एक्सप्रेस ट्रेन बराच काळ खोळंबली होती.

रेल्वे हेल्पलाइनवर ट्वीट करताना या प्रवाशाने साधूंचा सेल्फी फोटो घेऊन तोही ट्विट केला होता. हे ट्वीट पाहताच रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. पालघर रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांचा प्लॅटफॉर्मवरही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पालघर रेल्वे स्थानकत ट्रेन थांबल्यावर चार साधूच्या वेशातील व्यक्तींना जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्वीट करणारा प्रवाशी देखील त्यांच्यासोबत प्रवास करत होता. आरपीएफ पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यात तथ्यता नासल्याचे दिसून आले. मात्र या सर्वांमुळे 15 मिनिट ट्रेन पालघर स्थानकात थांबवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT