ममता बॅनर्जी आवर्जून ठाकरे कुटुंबाची भेट घेतात- संजय राऊत  Saam Tv
मुंबई/पुणे

ममता बॅनर्जी आवर्जून ठाकरे कुटुंबाची भेट घेतात- संजय राऊत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची काल बैठक झाली

जयश्री मोरे

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची काल बैठक झाली आहे. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) देखील उपस्थित होते. ममतांसोबत नेमकी काय चर्चा करण्यात आली आहे? याची माहिती राऊतांनी माध्यमांना दिली आहे. यावेळी राजकीय चर्चा झाली असून भाजपकडून तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर या विषयावर अधिक प्रमाणात चर्चा झाल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

ममता बॅनर्जी या शासकीय दौऱ्यावर असले, तरी मुंबईमध्ये आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना कोणी देखील भेटू शकत नाही. यामुळे ममता दीदींनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जींनी मुंबईमध्ये आल्याबरोबर सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे. तसेच उद्धवजींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आणि ते लवकर कामाला लागावे. राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रीय व्हावे, याकरिता ममता दीदींनी प्रार्थना केली, अशी माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली आहे.

भेटीमध्ये राजकीय चर्चा देखील करण्यात आले आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपचे कार्यकर्ते तपास यंत्रणांचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य पश्चिम बंगालमध्ये देखील सुरू आहे. आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत, असे ममता दीदींनी यावेळी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारी दहशतवाद्यांशी सामना करेल याची खात्री आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्याचे संजय राऊतांनी यावेळी सांगितले आहे.

ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये वाघिणीसारखी झुंज देऊन लांडग्यांना पळवून लावले आहे. त्यांच्याच रांगेत उद्धव ठाकरे, शरद पवार आहेत. शरद पवार यांच्या राजकीय उंचीचा एक देखील नेता देशात नाही. यामुळे ममतांची शरद पवारांसोबतची भेट अतिशय महत्वाची आहे. भाजपमधील हवा ममता दीदीने काढली आहे. समर्थ आघाडी उभी करायची असेल तर सर्वांना सोबत घेऊन जाव लागेल, असे मत पवारांचं आहे. त्यामुळे याविषयी कदाचित आज चर्चा होणार, असेही राऊत म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT