Mumbai : मुंबईत येताच ममता बॅनर्जींनी दिला 'जय मराठा' चा नारा SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत येताच ममता बॅनर्जींनी दिला 'जय मराठा' चा नारा

मुंबईला आले आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार असल्याच ममता बॅनर्जीं यांनी सांगितलं.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आल्या आहेत. यावेळी त्यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. आणि माध्यामांशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या 'तुकाराम ओंबळे यांनी जे देशासाठी काम केलं ते महान आहे आणि त्यामुळेच मी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी इथे आले आहे.' तसेच यावेळी त्यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिलीत त्याबद्दल मी आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा त्यांनी ममता बॅनर्जींनी यावेळी दिला.

हे देखील पहा -

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या तब्येती बाबत प्रार्थना केली आहे. ते लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त करते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणं शक्य होणार नाही डॉक्टरांनी सांगितला आहे. उद्धव ठाकरे यांना भेटता येत नसल्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत हे साडेसात वाजता मला ट्रायडंट येथे भेटणार असल्याचही त्यांनी सांगितलं.'

दरम्यान या भेटीत मला जो संदेश द्यायचा आहे तो मी त्यांना देईल असही त्या म्हणाल्या. उद्या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी मला जावं लागेल शिवाय शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील मी भेट घेणार आहे. मुंबईला आले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार असल्याच त्यांनी सांगितलं. तसेच अजुन मी पूर्ण मुंबई बघितली नाहीये लवकरच बघेल असही म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT