Uddhav Thackeray/Navab Malik SaamTV
मुंबई/पुणे

Cruise Drugs Party : मलिकांची मुख्यमंत्र्यांशी भेट; केली खास मागणी (पहा व्हिडीओ)

'बॉलीवूड बदनाम झाले तर त्याने मोठे नुकसान होईल'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर असताना ज्या काही घडामोडी झाल्या कॉर्डेलिया क्रूजवरील (Cordelia Cruise) ड्रग्ज पार्टी Drugs Party प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तसेच आपण आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज मी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

पहा व्हिडीओ -

मलिक म्हणाले 'आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याबाबत मी त्यांच्याशी बोललो असून एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली असल्याच मलिक यांनी सांगितलं.' तसेच ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी एक चिंता व्यक्त केली हॉलीवूड नंतर बॉलीवूड (Hollywood Bollywood) जगातील मोठी चित्रपट इंडस्ट्री आहे यातून देशाचा जीडीपी GDP वाढतो पण बॉलीवूड बदनाम झाले तर त्याने मोठे नुकसान होईल असही मुख्यमंत्री म्हणाले असल्याच ते म्हणाले. तसेच या प्रकरणा बाबत मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र (CM,PM) लिहणार असल्याच मलिकांनी सांगितलं.

दरम्यान हॉलिवूड नंतर बॉलिवूडचे नाव आहे बॉलिवूड बदनाम होत आहे बॉलिवूड मधून हजारो लोकांना रोजगार मिळतो याबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचही त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT