Oh... My God !!! मलिकांनी शेअर केले क्रांती रेडकर यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स...
Oh... My God !!! मलिकांनी शेअर केले क्रांती रेडकर यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स... Saam Tv
मुंबई/पुणे

Oh... My God !!! मलिकांनी शेअर केले क्रांती रेडकर यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स...

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्या विरोधात रोज नवनवे पुरावे ट्विटरच्या माध्यमातून सादर करत आहेत. यांनी कालच (ता. २२) समीर वानखेडे यांचा निकाहचा फोटो समोर आणला होता. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा मलिक यांनी एक नवीन ट्विट केलं आहे आणि त्याला कॅप्शन देत, 'अरे माझ्या देवा' अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (Screenshots Of kranti redkar Chats) यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

आज मलिकांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ''कोणीतरी एक व्यक्ती क्रांती रेडकर यांना मलिकांविरोधातील पुरावे असल्याचे सांगतात आणि क्रांती त्यांना रिप्लाय देत विचारते की, कुठला पुरावा आहे,? यावर समोरची व्यक्ती म्हणते की, मलिकांचा दाऊदसोबत फोटो आहेत. त्यानंतर क्रांती म्हणाल्या की, मलिकांविरोधात जर तू पुरावा दिला तर मी बक्षीस देईल. '' हे स्क्रीनशॉट शेअर करताना मलिकांना ओ माय गॉड, असं कॅप्शन दिलं असून आज सकाळीच मला हे गिफ्ट मिळाल्याचं ते सांगत आहेत.

दरम्यान, क्रांती रेडकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे या मुंबई सायबर क्राइम सेलकडे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत. नवाब मलिकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन क्रांती रेडकर यांच्या तथाकथित चॅट्सचे स्क्रीनशॉट शेयर केले हाते. हे चॅट्स खोटे असल्याचं सांगत आपण याविरोधात मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार आहे अशी माहिती अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये क्रांती रेडकर म्हणाल्या की, "या चॅट्स खोट्या तयार केल्या आहेत आणि पूर्णपणे खोट्या आहेत. माझे आजवर कोणाशीही असे संभाषण झालेले नाही. पुन्हा एकदा पडताळणी न करता केलेल्या पोस्ट. मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार आहे. समर्थकांनो काळजी करू नका ही, आमची संस्कृती किंवा आमची भाषाही नाही." असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT