Mumbai: टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; बजरंग दल मैदानात...(पहा व्हिडिओ)
Mumbai: टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; बजरंग दल मैदानात...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; बजरंग दल मैदानात...(पहा व्हिडिओ)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: मुंबई (Mumbai) महापालिकेची (Municipal Corporation) निवडणूक (Election) जस- जशी जवळ येत आहे. तस तसे वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात संघर्ष बघायला मिळत आहे. मालाडमध्ये (Malad ) पुन्हा तसेच काहीसे पहायला मिळाले आहे. मुंबईच्या (Mumbai) मालाडमध्ये असलेल्या क्रीडासंकुल मैदानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव देण्यात येणार आहे. काँग्रेस (Congress) नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे टिपू सुलतान यांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यांच्या या निर्णयाला एमआयएमने (MIM) देखील पाठिंबा दिला आहे. पण भाजपकडून टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करण्यात येत आहे. (Malad The name of Tipu Sultan was disputed)

पहा व्हिडिओ-

यामुळे भाजपकडून मालाडच्या मैदान परिसात शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवली आहे. या सर्व कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. विशेष म्हणजे बजरंग दल संघटना देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिसरात आंदोलकांकडून जोरजोरात घोषणाबाजी सुरु आहे. दरम्यान, मालाडच्या क्रीडासंकुल मैदानात वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल फलक जागोजागी असल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी मैदान प्रवेशद्वारावर अधिकृत फलक लावण्यात आले आहे.

या मैदानाला पोलिसांनी गराडा घातला आहे. या मैदानात सध्या क्रिकेट सामना सुरु आहे. मुंबईत अनेक भागात पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मैदानाच्या नामाकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. पण त्या अगोदरच भाजपकडून परिसरात आंदोलनाला सुरुवात केले आहे. पोलिसांनी आंदोलकांना मैदानात जाण्याापासून रोखले आहे. पोलिसांकडून आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. शिवाय मैदानाला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरले आहे. पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा मैदानाच्या चारही बाजूला आहे. (Malad The name of Tipu Sultan was disputed)

मालाडमध्ये आंदोलन सुरु झाल्यावर काही अनपेक्षित घटना घडताना दिसून येत आहेत. मैदानाजवळ चौकामध्ये काही इसमांनी बेस्ट बसच्या चाकांची हवा काढली आहे. ही बेस्ट बस आपल्या मार्गाने जात होती. यावेळी काही जणांनी बेस्ट बस थांबवत चाकांची हवा काढली आहे. विशेष म्हणजे काही जणांनी झोपून बसचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना त्रास देण्याकरिता हे सगळे सुरु आहे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पण बसची हवा ही आंदोलकांनी की गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी काढली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Lok Sabha Votting Live: माढ्यातील जनता मला या निवडणुकीमध्ये निवडून देईल : धैर्यशील मोहिते पाटील

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या झळा! पाण्याला मिळतोय सोन्याचा भाव; टँकर वाल्यांची चांदी

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

SCROLL FOR NEXT