Malad Police Station सुरज सावंत
मुंबई/पुणे

Crime: चित्रपटात काम देतो म्हणायचा अन् विनयभंग करायचा; कास्टिंग डायरेक्टरला बेड्या

ओमप्रकाश तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून त्याने काही महिन्यापूर्वी फिल्मशी संबधित तो एका नामांकित कंपनीत काम करत होता. त्यावेळी त्याने स्वत:च्या फेसबुकवर (Facebook) स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर अशी लिहिली होती.

सूरज सावंत

मुंबई - बंगाली चित्रपटातील अभिनेत्रीला हिंदी चित्रपटात (Hindi Movie) काम देण्याच्या नावाखाली बोलावून एका महिलेचा विनयभंग करण्याऱ्या कास्टिंग डायरेक्टरला मालाड पोलिसांनी अटक (Malad Police Arrested) केली आहे. नवोदित अभिनेत्रींना हिंदी चित्रपटात काम देण्याचे आमीष दाखवून त्यांना बोलावून ऑडिशनच्या नावाखाली हा त्यांचे विनयभंग करत असल्याचे तपासात समोर आले आहे. (Mumbai Latest Crime News)

हे देखील पहा -

ओमप्रकाश तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून त्याने काही महिन्यापूर्वी फिल्मशी संबधित तो एका नामांकित कंपनीत काम करत होता. त्यावेळी त्याने स्वत:च्या फेसबुकवर (Facebook) स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर अशी लिहिली होती. मोठ मोठ्या बाताकरून तिवारी हा अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा. अशाच प्रकारे बंगाली चित्रपटात काम करण्याऱ्या एका अभिनेत्रीच्या संपर्कात आला.

डिसेंबर 2021 मध्ये या बंगाली अभिनेत्रीला तिवारीने ऑडिशनच्या नावाखाली मुंबईला बोलावले. वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीला शाॅर्ट कपडे घालून फोटोशूट करण्यास सांगितले. हे करत असताना तिवारी अभिनेत्रीला वारंवार चुकीचा स्पर्श करत होता. यावर महिलेने आक्षेप घेतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी अभिनेत्रीने मालाड पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी २४ तासात आरोपीला अटक केली. आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT