ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हाला दिवस निरोगी आणि एनर्जेटिक सुरू करायचा असेल तर सकाळी उठल्यावर या ५ खास गोष्टी नक्कीच करुन बघा.
सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचन सुधारण्यास मदत होते.
रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरुन ठेवा. सकाळी उठल्यावर ठेवलेले तांब्याच्या भांड्यातले पाणी सकाळी प्या. याने इम्युनिटी वाढते आणि मेटाबॉलिझम सुधारतो.
सकाळी फ्रेश वाटण्याकरिता हलके योगासन किंवा स्ट्रेचिंग करा.शरीर सैल होते, रक्ताभिसरण सुधारते आणि मन फ्रेश राहते.
आदल्या दिवशी रात्री २ ते ४ बदाम भिजत घाला. सकाळी उठून भिजवलेले बदाम सोलून खा.मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि एनर्जी मिळते.
अनुलोम-विलोम किंवा खोल श्वसन करा.असे केल्यास तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा, कॉफी किंवा गोड पदार्थ खाणे टाळा. जर सकाळी या पदार्थांचे सेवन केल्यास अॅसिडिटी आणि पोटदुखी होऊ शकते.
रोज सकाळी उठून या पाच गोष्टी केल्यास तुमचे पचन सुधारेल तसेच वजन नियंत्रणात राहिल आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो.