ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दैनंदिन स्वयंपाक घरात स्वयंपाक लवकर कसा व्हावा यासाठी धडपड चालू असते. योग्य टिप्स वापरल्यास वेळ आणि गॅस दोन्ही वाचू शकतात.
कांदा चिरण्याआधी १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये किंवा थंड पाण्यात ठेवून द्या. थंड कांद्यामुळे डोळ्यात पाणी येत नाही आणि कांदा चिरण्यास सोपा जातो.
भाजी करत असताना मीठ शेवटी घाला. मीठ आधीच घातल्याने भाज्या पाणी सोडतात आणि भाजीला तेलही जास्त लागते.
आले लसूण पेस्ट हि अनेक भाज्यांमध्ये वापरली जाते. त्यामुळे तीचे योग्यरित्या साठवणूक करणे गरजेचे आहे. पेस्टमध्ये थोडे तेल आणि मीठ मिक्स करुन एअरटाइट डब्यात ठेवा. फ्रिजमध्ये ठेवल्यास १५ ते २० दिवस पेस्ट सहज टिकते.
डाळ आधी स्वच्छ धुवून घ्या, पाणी, हिंग आणि हळद टाकून त्यातच एक चमचा तूप किंवा तेल टाका. डाळ पटकन शिजते आणि उफाळून बाहेरही येत नाही.
पोळीचे पिठ मळताना त्यात कोमट पाणी आणि १ चमचा तेल वापरा . यामुळे पोळ्या जास्त वेळ मऊ आणि फुगलेल्या राहतात.
या छोट्या हॅक्समुळे स्वयंपाक पटकन होण्यास मदत होते. तसेच गॅस आणि वेळही वाचतो.