ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वॉशिंग मशीनच्या नियमित सफाईमुळे तीचे आयुष्य वाढून कपडे सुध्दा चांगले सुगंधित धुतले जातात.
प्रत्येक महिन्यात एकदा रिकाम्या वॉशिन मशिनमध्ये गरम पाणी आणि व्हिनेगर टाकून मशिन फिरवून घ्या. यामुळे आतील भाग स्वच्छ होतील.
वॉशिंग मशीनचा आतील भाग आणि दरवाजाची रबर गॅस्केट ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करा.
वॉशिंग मशीनमध्ये साचलेली घाण आणि लहान कचरा काढण्यासाठी फिल्टर नियमितपणे काढून स्वच्छ करा.
वॉशिंग मशीनचा बाहेरील भाग स्वच्छ आणि धूळ व घाणीपासून लांब ठेवा.
वॉशिंग मशीन सपाट भागावर ठेवा. यामुळे मशीन लावल्यावर आवाज कमी होईल.
मशीनमध्ये पावडर किंवा डिटर्जंट टाकल्यास अतिरिक्त फेस तयार होतो. फेस टाळण्यासाठी योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरावे.
जर मशीनमधून दुर्गंधी येत असेल, तर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरून ते स्वच्छ करा.