ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील पंख्यावर दर १० ते १५ दिवसांनी धूळ बसली जाते आणि पंखा अस्वच्छ दिसू लागते. पंख्याच्या पातींवर धुळीचे थर बसल्यामुळे पंख्याची हवा कमी लागते. साचलेली घाण कशी साफ करायची त्यासाठी जाणून घ्या युनिक टिप्स.
सर्वात आधी पंख्याचा मेन स्वीच बंद करावा. पंखा बंद केल्यावर १० मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून द्या. नंतर साफसफाई चालू करा.
ओल्या कपड्यांनी पंख्याच्या पातींना पुसून घ्या. याने पातींवर असलेली घाण थोड्या प्रमाणात निघण्यास मदत होईल.
पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्याचे मिश्रण बनवून घ्या आणि त्यात कपडा बुडवा. आता याने पंखा साफ करा. बेकिंग सोड्यामुळे पंख्यावरील चिकटपणा दूर होतो.
पाण्यात लिंबाचा रस आणि डिटर्जंट पावडर मिक्स करा. हे मिश्रण पंख्यावर लावून तो स्वच्छ करा.
जर पाती धूळयुक्त, चिकट आणि काळ्या पडल्या असतील, तर त्यांना व्हिनेगरने स्वच्छ करा. व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि हे मिश्रण वापरून पंखा स्वच्छ करा.
कोमट पाण्यात लिंबाचा रस, मीठ आणि बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण पंखा स्वच्छ करण्यासाठी वापरा. पंख्याची पाती चकचकीत स्वच्छ होतील.