Malad News Saam Tv
मुंबई/पुणे

टिपू सुलतान नाही, झाशीची राणी लक्ष्मी बाई!अखेर मालाड मधील मैदानाचं नामकरण

अखेर शिवसेनेच्या प्रस्तावाला मंजुरी , काँग्रेसची नाराजी

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आगामी काळात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) पुन्हा पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगर पालिकेत शिवसेना नगरसेवकांकडून मालाड मधील टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाने ओळखल्या जाणाऱ्या मैदानाचं "झाशीची राणी लक्ष्मी बाई" असं नामकरण करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता , हा प्रस्ताव पालिकेच्या बाजार व उद्यान समितीत मंजूर झाला आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ययांच्या मतदारसंघात हे मैदान असून त्यांनी त्यांच्या या मतदार संघातल्या मैदानाचं सुशोभीकरणानंतर उदघाटन केलं होतं. त्यावेळी मैदानाच्या प्रवेशद्वारावर टिपू सुलतान असं नामफलक डदेखील लावण्यात आला होता. तेव्हा भाजप नेत्यांनी या नावावर आक्षेप घेत आंदोलन केलं होतं , त्यानंतर हे नाव अधिकृत नसल्याचा दावा शिवसेनेने केला होता . तेव्हा या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास निश्‍चितच त्याचा विचार करु असं महापौर किशोर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं होतं.

हे देखील पहा -

या बाबत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक उपमहापौर ऍड.सुहास वाडकर, मालाडच्या पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, कांदिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ हुंडारे, नगरसेविका गीता भंडारी, शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी महापौरांना पत्र पाठवून या मैदानाला 'झाशीची राणी लक्ष्मी बाई' असे नाव देण्याची मागणी केली होती . महापौरांकडून हे पत्र बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष प्रतिमा खोपडे यांना पाठविण्यात आलं होतं . त्यानंतर बाजार व उद्यान समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकित हा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करुन आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान या प्रस्तावावर मजुरी मिळाली असल्यामुळे लवकरचं या मैदानाला अधिकृतपणे 'झाशीची राणी लक्ष्मी बाई' नावाने ओळखलं जाईल. पण त्या आधी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. कारण या मैदानाला 'टिपू सुलतान' हेच नाव असावं अशी काँग्रेसची भुमीका होती, सध्या या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया आली नसली, तरी सपाने या प्रस्तावाला विरोध केला होता. टिपू सुलतान हेच नाव या मैदानाला राहू द्यावं अशी सपाची मागणी आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT