Make Penguin Mayor said Chitra Wagh Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: पेंग्विनला महापौर बनवा! चित्रा वाघ यांचा किशोरी पेडणेकरांना खोचक सल्ला

Mumbai: पेंग्विन्सच्या 'इंग्रजी' नामकरणावरुन चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौरांवर बोचरी टीका केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विन्सच्या नामकरणावरुन राजकारण गंमतीशीर बनलंय. यापुढे हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाच्या पिल्लाचं ‘चिवा’ असे नाव ठेवू, असा टोला मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लगावला होता. यानंतर ऑस्कर नावावरून मिरची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी ‘पेंग्वीनकर’ ताईंचा चांगलाच भडका उडालाय, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. (Make Penguin Mayor Chitra Wagh sarcasm to Kishori pednekar)

हे देखील पहा -

राणीबागेतील (Ranibaug) दोन पेंग्विन्सच्या (Penguins) पिल्लांचं आणि वाघाच्या बछड्याचं बारसं करुन त्यांचं नामकरण करण्यात आलं होतं. त्यातल्या एकाचं नाव ऑस्कर तर दुसऱ्याचं नाव ओरिओ असं ठेवण्यात आलं होतं. या पेंग्विन्सच्या 'इंग्रजी' नामकरणावरुन चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौरांवर बोचरी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर (Kishori Pendekar) म्हणाल्या की, "‘तुम्ही सांगत आहात की, नाव मराठीत ठेवा तर यापुढे हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाच्या पिल्लाचं ‘चिवा’ असे नाव ठेवू. आम्ही सामान्य जनतेसाठी कामे करीत आहोत. परंतु, ही कामं न पाहता फक्त विरोधाला विरोध म्हणून खालच्या पातळीवरील टीका करणे योग्य नाही. आम्ही वाघिणीच्या बछड्याचे नाव ‘विरा’ ठेवले आहे. हे नाव मराठीतच आहे. प्राण्यांची नावे मराठीत ठेवण्याची भाजपची मागणी असेल तर यापुढे हत्तीच्या पिल्लाचे ‘चंपा’ असे नाव ठेवू आणि माकडाच्या पिल्लाचं ‘चिवा’ ठेवू, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला होता.

किशोरी पेडणेकरांच्या या वक्तव्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, "ॲास्कर नावावरून मिरची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी पेंग्वीनकर ताईंचा चांगलाच भडका उडालाय..! By the way: पेंग्विनला मराठमोळं ‘पेग्विनकर’ हे नाव कसं वाटतंय? नि त्याला आपण प्राणीसंग्रहालयाचा महापौरही बनवुया!" असं ट्विट करत त्यांनी किशोरी पेडणेकरांवर पलटवार केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT