rahul gandhi news  Saam tv
मुंबई/पुणे

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

rahul gandhi news : वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. नेमकं कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

वीर सावरकर बदनामी प्रकरणात पुणे न्यायालयात सुनावणी सुरू

सात्यकी सावरकर यांचा उलटतपास सुरू

राहुल गांधी यांच्या आवाजाच्या नमुन्यावरील अर्ज सध्या स्थगित

पुणे : वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्याच्या एमपी/एमएलए प्रथमवर्ग विशेष न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या भाषणावरून दाखल झालेल्या बदनामी खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे.

बदनामी प्रकरणातील फिर्यादी सात्यकी सावरकर यांची मुख्य साक्ष नोंदवून पूर्ण झाली आहे. आता राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी यांचा उलटतपास (क्रॉस-एक्झामिनेशन) सुरू आहे. खटला दाखल झाल्यानंतर त्या वेळी कार्यरत असलेल्या प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती अक्षी जैन यांच्या न्यायालयात अनेक वेळा युक्तिवाद झाला.

मात्र, प्रकरणाची दखल घेण्यास त्या तयार नसल्याचे आणि गंभीर आरोप सात्यकी यांनी केली होते. त्यानंतर फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी ५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्याकडे ट्रान्सफर पिटीशन दाखल केली होती. यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी १८ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधित न्यायाधीशांकडून त्यांच्या विरोधातील आरोपांबाबत गोपनीय अहवाल मागवला होता. १५ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविण्यात आलेला तो गोपनीय अहवाल या न्यायालयात सादर करण्यात यावा, असा अर्ज अ‍ॅड. पवार यांनी केला होता.

तत्पूर्वी, फिर्यादीकडून राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना (व्हॉईस सॅम्पल) घेण्याचा अर्ज मागील तारखेस दाखल करण्यात आला होता. त्यावर राहुल गांधी यांच्या वकिलांचे म्हणणे मागवण्यात आले होते. मात्र, आता फिर्यादीकडूनच तो अर्ज सध्या स्थगित किंवा प्रलंबित ठेवण्याची विनंती करण्यात आल्याने आवाजाच्या नमुन्यावरील सुनावणी तात्पुरती स्थगित, प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करण्यासंबंधीचा अर्ज देखील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी स्थगित ठेवण्याची विनंती केल्याने तोही सध्या स्थगित, प्रलंबित ठेवण्यात आला आहे.या प्रकरणात फिर्यादी यांचा पुढील उलटतपास दिनांक १२ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT