Eknath Shinde Saam tv
मुंबई/पुणे

महापौरपदावरून मोठा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार

Ulhasnagar Politics: उल्हासनगरच्या महापौरपदावरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला आहे.

Vishal Gangurde

उल्हानगर महापालिकेत शिंदे गट सत्ता स्थापन करणार

सत्ता स्थापनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा शिंदे गटाला पाठिंबा

शिंदे गट भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार

अजय दुधाणे, साम टीव्ही

उल्हासनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उल्हासनगर महापालिकेत निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारत मार्ग काढला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिंदेसेना सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदेंच्या खेळीमुळे भाजप सत्तेपासून दूर राहणार आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार असल्याचे निश्चित झालं आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे एकूण ३७-३७ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच १ काँग्रेस, २ वंचित बहुजन आघाडी आणि १ अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण 78 नगरसेवक आहेत . मात्र स्पष्ट बहुमत दोन्ही पक्षांना मिळू शकले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर 1 अपक्ष आणि 2 वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक शिवसेनेच्या ताब्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आता दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना आणि वंचितचे 2 नगरसेवक अज्ञातस्थळी आहेत. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना या पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे प्राध्यापक सुरेश सोनवणे यांनी म्हटले आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'उल्हासनगर महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केलाय. नुकतीच त्यांनी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केलं. या दोन्ही नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, ठामपा नगरसेवक योगेश जानकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT