BMC Election Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत वंचित बहुजन आघाडीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का; ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने बंडखोरी उफाळली

BMC Election : मुंबईत वंचित बहुजन आघाडीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी उमेदवारी डावल्याने बंडखोरी उफाळून आली आहे.

Vishal Gangurde

मुंबईत निवडणुकीची रणधुमाळी

राजकीय पक्षांवर बंडखोरी थोपण्याचं आव्हान

वंचित बहुजन आघाडीतही बंडखोरी

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांना आता बंडखोरी थोपण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पक्षात उमेदवारी डावलल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. मुंबईतील विविध वॉर्डातही बंडखोरी उफाळल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसशी युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीला देखील बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोवंडीतील वॉर्डातही बंडखोरी उफाळून आली आहे.

निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने गोवंडीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गोवंडीतील वॉर्ड क्रमांक १३९ मधील पदाधिकाऱ्यांमध्ये ही नाराजी दिसून आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या गोवंडमधील वॉर्ड क्रमांक १३९ चे अध्यक्ष विशाल बनसोडे यांच्या पत्नी रेखा बनसोडे या इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, निवडणुकीत ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे रेखा बनसोडे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने या वॉर्डात भांडुपच्या मुंबई महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी रेखा विशाल बनसोडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या नाराज पदाधिकाऱ्यांचं म्हणण आहे की, स्थानिक प्रश्नांची जाण नसलेल्या भांडुपच्या पदाधिकाऱ्याला गोवंडी विभागातील वॉर्ड क्रमांक १३९ ची उमेदवारी देणे हे स्थानिकांवर अन्याय आहे. प्रभागातील प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व असावे. विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहोत म्हणून आम्ही लढायचा निर्णय घेतला आहे. आम्ही विभागातील सगळे रहिवासी ही निवडणूक लढणार आणि जिंकून येणार, असा दावा त्यांनी केला. या घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडी यावर काय तोडगा काढते, हे पाहावे लागेल.

भांडुपमध्ये ठाकरे गटाला धक्का

मुंबई भांडुपमध्ये ठाकरे गटाच्या वार्ड क्रमांक 109 च्या महिला पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार दिपाली गोसावी यांना समर्थन दिलं आहे. दिपाली गोसावी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असं सांगण्यात आलं. परंतु ऐनवेळी सुरेश शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होऊन पक्षातून बंडखोरी करत दिपाली गोसावी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर, भटक्या कुत्र्यांवर शिक्षक ठेवणार ‘पाळत’?

Khandala Accident: खंडाळ्यातल्या खंबाटकी घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोची तीन वाहनांना धडक

भाजपसोबत दुरावा, पवारांशी घरोबा? पुण्यात शिंदेसेनेसोबत दोन्ही राष्ट्रवादीची युती?

ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली; राजकारणात दिला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिका निवडणूक: वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

SCROLL FOR NEXT