major fire breaks out in a plywood mart and adjoining cake shop at manpada junction ghodbunder road in thane saam tv
मुंबई/पुणे

Thane Fire News : ठाण्यातील मानपाडा नाक्यावर भीषण आगीत दुकान जळून खाक, नजीकच्या रुग्णालयात धावपळ

Fire in a Plywood Mart at Manpada: ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वातविल जात आहे.

विकास काटे

Thane Fire News : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा नाका या ठिकाणी आज (शुक्रवार) एका दुकानाला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की आग लागलेल्या दुकानाच्या शेजारील दोन्ही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. (Breaking Marathi News)

ही आग प्लायवूडच्या दुकानाला आग लागली होती. या घटनेची माहिती कळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पाेहचल्या. प्लायवूडच्या दुकानातील संपुर्ण लाकडाने पेट घेतला. त्यामुळे आगीने राैद्ररुप धारणा केले. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या आणखी दाेन गाड्या घटनास्थळी आल्या. ही आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. (major fire breaks out in a plywood mart and adjoining cake shop at manpada junction ghodbunder road in thane)

या दुकानाच्या मागे एक हॉस्पिटल आहे. ही आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळलं आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वातविल जात आहे.

दरम्यान दुकानाला आग लागल्यानंतर बाजूलाच असलेल्या रुग्णालयातील पेशंटला सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णालयाच्या बाहेर (खाली) आणले आले आहे. आवश्यकता वाटल्यास पेशंटला इतरत्र हलविण्यात येईल असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT