Srikar and Pramila Chaudhary resign from BJP, sparking political upheaval in Kalyan–Dombivli ahead of KDMC elections. Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत भाजपला मोठा हादरा; १०-१० वर्षे नगरसेवक असलेल्या नेत्यांनी बेधडक पक्ष सोडला

Internal Factional Politics In Bjp Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी पक्षातील गटबाजी व कुरघोडीमुळे राजीनामा दिला असून या घडामोडींचा केडीएमसी निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी पक्षाला राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. चौधरी दाम्पत्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी पक्षातील कुरघोडीचे राजकारण, अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

चौधरी दाम्पत्याने स्पष्ट केले की, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही कार्यकर्त्यांना योग्य सन्मान आणि संधी दिली जात नाही. कुरघोडीच्या राजकारणामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत आहे. डोंबिवली परिसरात चौधरींचा मजबूत जनसंपर्क असल्यामुळे त्यांच्या या राजीनाम्याचा आगामी केडीएमसी निवडणुकीत भाजपवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.दरम्यान, चौधरी दाम्पत्य पुढे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्क-वितर्कांना ऊत आला असून त्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पायाला भिंगरी लावून राज्यभर दौरा करत असून मोठमोठे नेते गळाला लावत त्यांचा पक्षप्रवेश करत आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटातीलच दिग्गज नेत्यांना पक्षप्रवेश दिल्याने भाजप आणि शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. तसेच ठाकरे गटाला देखील सुरुंग लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक माजी नगरसेवक हे ठाकरेंना रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करत आहे.

मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकर चौधरी आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत पक्षाच्या अंतर्गत कुरघोडीमुळे हा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. आगामी निवडणुकीत वारे फिरणार का? प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात अनामत रक्कम भरण्यासाठी उमेदवाराने आणली पिशवी भरून चिल्लर

माजी महापौरांना डच्चू? ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत किशोरी पेडणेकरांचे नाव नाही, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

हनिमूनसाठी श्रीलंकेत, अचानक दोघांचा वाद; आधी बायकोने आयुष्य संपवलं, नंतर नवऱ्याचंही टोकाचं पाऊल

Thane Election: मोठी बातमी! ठाण्यात मविआ फुटली, काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Manchurian Recipe: घरी बनवलेले मंच्युरियन नरम पडतात? ही सोपी ट्रिक वापरा, होतील कुरकुरीत

SCROLL FOR NEXT