पुणे वनविभागाची मोठी कारवाई; तब्बल 5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुणे वनविभागाची मोठी कारवाई; तब्बल 5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

पिंपरी चिंचवड येथील पूर्णानगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी पुणे Pune नविभागाने सहा जणांना रंगेहाथ पकडले आहे. या आरोपींकडून तीन किलोग्रॅमचा व्हेल माशाच्या उलटी सदृश पदार्थासह चारचाकी जप्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad येथील पूर्णानगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे. मुहमदनईन चौधरी, योगेश्वर साखरे, अनिल कामठे, ज्योतिबा जाधव, कृष्णात खोत आणि एका महिलेला वनविभागाने पकडले. वनविभागाला काही अज्ञात व्यक्ती व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

हे देखील पहा -

या माहितीच्या आधारे सहायक वनसंरक्षक पुणे विभाग, वनपरीक्षेत्र अधिकारी भांबुर्डा व वनकर्मचारी यांनी बनावट ग्राहक बनून त्यांच्यासमोर गेले आणि सापळा रचून या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल महेश मेरगेवाड, रामेश्वर तेलंग्रे, वनरक्षक महादेव चव्हाण, विजय शिंदे, वनरक्षक बर्ले, आणि गणेश पाटील यांनी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT