Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मुळशीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोवा बनावटीची 57 लाखांची दारु जप्त

गोवा राज्य निर्मित मद्याची अवैध रित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने मोहिम राबवली.

Shivani Tichkule

Latest Pune News: राज्य उत्पादन शुल्कच्या वतीने मुळशी तालुक्यातील मौजे माले गावचे हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर पुणे माणगाव हायवे रोडवर धडक कारवाई करत तब्बल ५७ लाख २५ हजार ५२० रुपयांच बेकायदेशीर मद्य जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दानाराम नेहरा आणि रुखमनाराम गोदरा या दोन जणांना अटक केली आहे. (Latest Marathi news)

राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty) यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे (Pune) या पथकाने गोवा राज्यात विक्री करीता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैध रित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने मोहिम राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुळशी (Mulshi) तालुक्यातील मौजे माले गावचे हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर पुणे माणगाव हायवे रोडवर संशयित ट्रक वाहानाची चौकशी करीत असताना एक सहा चाकी ट्रक थांबवून वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली. (Pune News)

वाहन चालकाने त्यामध्ये औषधे व इंजक्शन असल्याचे सांगितले परंतू त्याने संशयितरीत्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजुस घेऊन तपासणी केली असता बेकायदेशीर मद्य आढळून आलं. वाहन चालकाकडे मद्य वास्तुकेचे संदर्भातील कोणताही वाहतुक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यांच्यांकडून 57 लाखाचा मुद्देमाल व मद्य जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

Maharashtra Live News Update: नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर हौशी जोडप्याची फजिती

SCROLL FOR NEXT