पुणे-बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात झाला
भरधाव कंटेनरने तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली
अपघातामध्ये ७ ते ८ जण जखमी झाले
या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी दरीपुलावर विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनरने तीन ते चार कारला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कुणाचा मृत्यू झाला नाही. पण या अपघातामध्ये सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळील दरी पुलावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने एक एक करत तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. काही वाहनांच्या काचा फुटल्या तर काही वाहनांचे तुकडे झाले. या अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातामध्ये जखमी झालेल्या सात ते आठ जणांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी सर्व अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.