Mumbai-Pune Expressway Acident
Mumbai-Pune Expressway Acident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Pune Expressway Acident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आठवडाभरापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) सहा वाहनांना विचित्र अपघात झाला आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने खोपोलीजवळ तब्बल ५ वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. प्राथामिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघाताच्या घटना घडत आहे. आठवडाभरापूर्वी एक्सप्रेस वेवरील बोरघाटात भरधाव वेगात जाणाऱ्या कारने आपल्यासमोर असलेल्या इतर वाहनांना जोरदार धडक दिली होती.

ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले होते. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये का पाठवले? आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंच्या टीकेवर हल्लाबाेल, Video

KL Rahul Record: केएल राहुलला नंबर १ बनण्याची संधी! अवघ्या ३५ धावा करताच रचणार इतिहास

Buldana News | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

Narayan Rane: उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून पळून गेले होते, मीच परत आणलं; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

Best Bus News: लवकरच तिकीट दरवाढ! बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT