Amit Shah : श्रद्धा वालकर प्रकरणावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यावेळी आमचे सरकार....

जेव्हा श्रद्धाने आरोपी आफताबविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती, तेव्हा त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई का झाली नाही? असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे
Shraddha Walkar Case Amit Shah First Reaction
Shraddha Walkar Case Amit Shah First ReactionSaam TV

शिवाजी काळे, साम टीव्ही

Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. २६ वर्षांच्या श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली. आरोपी आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. या घटनेनं देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. (Shraddha Walkar Case Union Home Minister Amit Shah First Reaction)

Shraddha Walkar Case Amit Shah First Reaction
Shraddha Walkar Case : आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? पोलिसांना लोकेशन समजलं; पण...

माझं या संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, हे ज्या कोणीही केले असेल, दिल्ली पोलिस न्यायालयाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा देईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही, तर जेव्हा श्रद्धाने आरोपी आफताबविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती, तेव्हा त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई का झाली नाही? असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. ज्यावेळी हे प्रकरण झालं, त्यावेळी राज्यात आमचं सरकार नव्हतं. या प्रकरणाला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असा इशाराच अमित शहा यांनी दिला आहे.

श्रद्धा प्रकरणावर काय म्हणाले अमित शाह?

दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. अमित शहा म्हणाले, 'माझं या संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, हे ज्या कोणीही केले असेल, दिल्ली पोलिस न्यायालयाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा देईल'.

Shraddha Walkar Case Amit Shah First Reaction
Nashik Crime : अल्पवयीन मुलाकडून ४ वर्षीय चिमुकल्याची हत्या; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील खूनाचा अखेर उलगडा

'त्यावेळी राज्यात आमचे सरकार नव्हते'

'दिल्ली पोलिसांची (Police) यात कोणतीही भूमिका नाही. 2020 मध्ये, श्रद्धाने महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनला पत्र देऊन तिच्या शरीराचे तुकडे केले जाणार असल्याची तक्रार केली होती आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई का झाली नाही. याची देखील चौकशी होणार आहे. त्यावेळी राज्यात आमचे सरकार नव्हते. या प्रकरणाला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल'.

आफताबने दिली श्रद्धाच्या खूनाची कबूली

वसईची रहिवासी असलेल्या २६ वर्षांच्या श्रद्धाची तिचा प्रियकरआफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली. श्रद्धा-आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. जवळपास सहा महिन्यांनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाला. सध्या पोलीस आफताबची कसून चौकशी करीत आहेत. आरोपी आफताबनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com