Malad Police Station सुरज सावंत
मुंबई/पुणे

Malad Crime News: मोलकरणीचं भयंकर कृत्य! वृद्ध महिलेची मान पाण्याने भरलेल्या बादलीत दाबली अन्...

Shivani Tichkule

संजय गाड

Mumabi Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता मुंबईच्या मालाड येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या मालाड मालाड (Malad) परिसरात एका वृध्द महिलेची तिच्या घरी काम करणाऱ्या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारी सिलिन विल्फ्रेड डिकोस्टा नावाच्या या ६९ वर्षीय महिलेची बाथरूम मध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत डोके बुडवून हत्या करण्यात अली आहे. या प्रकरणी मालाड पोलीस आणि गुन्हे शाखेने घरी काम करणारी शबनम शेख, ४२ तिचा मुलगा आणि प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

शबनम शेख ही गेल्या २५ वर्ष पूर्वी पासून डिकोस्टा यांच्या परिचयाची असून त्यांच्या घरी काम करत असे. गुरवारी संध्याकाळच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला, नातू कामा निमित्त बाहेर असताना या आरोपींनी संधी साधून डिकोस्टा यांची हत्या करून घरातील सोन्याची चैन, स्मार्ट वॉच आणि मोबाईल यांच्यासह पोबारा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Maharashtra News)

गुरवारी संध्याकाळी जेव्हा डिकोस्टा यांनी फोन उचलला नाही तेव्हा नातू निल रायबोले याने शेजारच्यांना फोन केला. त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता त्यांना पाण्याने भरलेल्या बादलीत डिकोस्टा यांचा तोंड बुडालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ इतर लोकांना मदतीसाठी बोलावले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी येताच त्यांनी तपासाला सुरवात केली. सीसीटीव्ही (CCTV) फूटेजची पाहणी केली असता त्यात साडेचारच्या सुमारास घरात काम करणारी शबनम आणि तिचा मुलगा बाहेर पडताना आणि अगदी त्याच वेळी मास्क आणि टोपी परिधान केलेला एक अनोळखी इसम घरात प्रवेश करताना दिसला.

घरातून बाहेर पडताना शबनम आणि तिच्या मुलाने घर बंद आहे का पाहण्याची साधी तसदी ही घेतली नाही ना त्या अनोळखी इसमाला घरी प्रवेश करण्यापासून रोखले. अगदी काही मिनिटांनी हा इसम देखील घरा बाहेर पडताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डिकोस्टा यांच्या मृत्यूची खबर मिळताच शबनम आणि तिचा मुलगा देखील देखील घरी आले होते मात्र काही वेळातच ते कोणालाही काही न सांगता निघून गेले. शबनमला गुन्हे शाखेने मालवणी येथून ताब्यात घेतले असून इतर दोघांना मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांनी ही गुन्हा केल्याच कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT