Eknath Shinde, ajit Pawar and devendra Fadnavis saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी; महायुतीत भूकंप

Maharashtra Political News : राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी हाती आली आहे. महायुतीत राजकीय भूकंप झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तीव्र नाराजीनाट्य

  • शिंदे गटातील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी

  • अजित पवार मात्र महायुतीत नाराजी नसल्याचं म्हटलं आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीतही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसत आहेत. काही ठिकाणी शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावरील या नाराजीनाट्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचेही पाहायला मिळत आहे.

फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीतच नाराजीनाट्य सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षप्रवेशामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आम्हाला जर अधिकार , निधी वाटप , अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील बैठकीला येऊन उपयोग काय असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाराजीनाट्यादरम्यान शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालायचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी कॅबिनेट बैठकीला जातो असं म्हणून शिंदे बैठकीला गेल्याची माहिती मिळत आहे. भाजपची वाटचाल ही स्वबळावर जायची आहे. ते त्याच पद्धतीने वागत आहेत अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सेना मंत्र्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'तुम्ही उल्हासनगरमध्ये सुरुवात केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असं होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे अशा शब्दात फडणवीसांनी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कल्याण- डोंबिवली प्रवेशावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीनाट्यानंतर उदय सामंत हे रविंद्र चव्हाणांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे. सामंत हे रवींद्र चव्हाणांच्या रायगड निवाससस्थानी भेटीला गेल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे. महायुतीतील नाराजीनाट्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटाळला आहे. 'नाराजी वगैरे असं काही नाही. मी तुमच्याकडून सर्वकाही ऐकत आहे, असे ते म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीतून शिंदे गटातील कुणी भाजपमध्ये प्रवेश केला?

दिवंगत वामन म्हात्रेंचे पुत्र अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील , सायली विचारे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण, विशेष मकोका न्यायालयात 15 वी सुनावणी

Shocking : नाशिक हादरलं! बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बुटाच्या लेसने गळा आवळला

Accident: पहाटे अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

Gen Z Shortforms : Gen - Z जे ट्रेंडी शब्द वापरतात त्याचा फुल फॉर्म नेमका काय? जाणून घ्या

kadipatta chutney: कढीपत्त्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी; चव आणि आरोग्य दोन्हींसाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT