Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महायुतीतील वाद चव्हाट्यावर; नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, राज्य सरकारचा मोठा निर्णय

maharashtra state government decision : महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. राज्य सरकारने रविवारी रात्री हा मोठा निर्णय घेतला आहे.

Ganesh Kavade

मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. पालकमंत्रिपदवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आला आहे. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने पालकमंत्रिपदाची निवड रद्द केली आहे. राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महायुती सरकारने शनिवारी पालकमंत्रिपदाचं वाटप जाहीर करण्यात आलं होतं. या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांच्यासहित अनेक मंत्र्यांना वगळण्यात आलं होतं. त्यानंतर महायुतीमधील घटकपक्षामध्ये नाराजी उफाळून आली होती. पालकमंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर शिवेसेना नेता, मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना देण्याला गोगावले यांचा विरोध होता. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्याने दादा भुसे यांना नाराज झाले. त्यानंतर आज रविवारी रात्री महायुतीत मोठ्या हालचाली झाल्या. त्यानंतर आज सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

रविवारी रात्री उशिरा राज्य सरकारने रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री निवड रद्द करण्यात आली आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. तसेच रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिल्याचा निषेध देखील व्यक्त केला होता.

पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?

महायुती सरकारने रविवारी रात्री पालकमंत्रिपदाचं वाटप केलं होतं. या यादीतून अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर या मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आल्याचं दिसून आलं होतं. या वाटपावर भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT