Mahavikas Aaghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार

प्रत्येक पक्षाला दोन जागा देणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार आहे. प्रत्येक पक्षाला दोन जागा देणार असल्याचे बोलले जात आहे. आज राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत या संबंधीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी बैठक झाली. ट्रायडंट हॉटेलमध्येच ही बैठक झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील , बाळासाहेब थोरात, एच के पाटील, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, एकनाथ शिंदे, अनिल परब, अनिल देसाई या बैठकीत उपस्थित होते.

या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची (Election) चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सहा जागा लढणार आहे, प्रत्येक पक्षाना दोन जागा मिळणार आहेत.

महाविकास आघाडीची ती खेळी यशस्वी

राज्यसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करुन, आपण राज्यसभेची जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीला अपक्ष आमदारांचीही उपस्थिती होती.

२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

या तेरा आमदारांची बैठकीला उपस्थिती

आमदार आशिष जैस्वाल, किशोर जोरगेवर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल, राजेंद्र याद्रावकर, शंकरराव गडाख या तेरा आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. विधानसभेत एकुण २९ आमदार अपक्ष आहेत. यातील १३ आमदार आज उपस्थित होते, राहीलेले १६ आमदार नेमके कोणाला मतदान करणार हे अजुनही स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT