MAhavikas Aghadi  Saam TV
मुंबई/पुणे

Mahavikas Aghadi News : शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम, काँग्रेस-ठाकरे गटाची राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्याबाबत चर्चा?

Political News : शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे.

Rashmi Puranik

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी विभागणी पक्षात झाली. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबतच आहे. मात्र पक्षफुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटी, तसेच शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे.

शरद पवारांनी भाजपसोबत न जाण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही महाविकास आघाडीतील पक्ष शिवेसना ठाकरे गट आणि काँग्रेसने आपला प्लान बी रेडी ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाशिवाय निवडणूक लढण्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेची प्रार्थमिक चर्चा झाल्याची माहितीसमोर येत आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला फटका बसत असल्याने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सावध भूमिका घेतली आहे.

शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम आहे. राष्ट्रवादी स्पष्ट भूमिका घेत नसल्याने काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढण्याचा प्लॅन बीची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे यांनी माझी काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा झाली आहे, त्यामुळे संभ्रम नाही असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' हळदीचे खास उपाय

IndW vs SAW Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप फायनल लाइव्ह कुठे बघाल फ्री? वाचा

Gauri Kulkarni: गोऱ्या गोऱ्या रंगाची 'ही' अभिनेत्री कोण?

Maharashtra Live News Update : मनमाड परिसरात जोरदार पावसाची हजेरी

Thane To Amravati: ठाणेहून अमरावतीला कसे पोहोचाल? 'या' मार्गांचा वापर करून करा आरामदायी प्रवास

SCROLL FOR NEXT