Uddhav Thackeray Mahavikas Aaghadi Metting Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुंबई महापालिका निवडणूक 'मविआ' एकत्र लढणार?; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) घटकपक्षांच्या नेत्यांची आज विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. जवळपास १ तास ही बैठक सुरू होती. बैठकीत राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरून चर्चा झाली. दरम्यान बैठकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणूक मविआ एकत्र लढणार का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. (Uddhav Thackeray Todays News)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडी फुटलेली नसून आम्ही अजूनही एकत्रच आहोत. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळत सांगेन असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र भेटलो आहोत. आमच्यामध्ये चांगल्या गप्पा झाल्या. पक्षाचे नेते एकत्र भेटलो. चांगल्या गप्पा झाल्या. मी हेच सांगितलं की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोनाचा सामना केला. यापुढे हे संकट काय? जगावर कोरोनाचं संकट असताना आम्ही लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा, एक चांगला कार्यक्रम दिला. त्या संकटापुढे हे संकट काहीच नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता आम्ही आता बऱ्याच दिवसांनी भेटलो आहोत. एकत्र भेटून बरं वाटलं. आम्ही फुटलेलो नाही. पुढे काय करायचं ते लवकरच ठरवू आणि तुम्हाला सांगू, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. (Uddhav Thackeray News)

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बैठकीत शिंदे गटावर निशाणा साधला. 'जे आपले होते तेच आपले शत्रू झाले, ही परीक्षा आहे. जगभरात संकट असताना सत्ता होती. संकट गेल्यावर सत्ता काढून घेतली. महाविकास आघाडीने मांडलेले तिन्ही अर्थसंकल्प चांगले होते. या काळात आरोग्यसुविधा वाढवल्या. आता सत्तेत नसताना देखील आपण पुढील अडीज वर्षात चांगलं काम करूयात. हे खोके सरकार आहे' असा टोला देखील ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे दाखल होताच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरूवात केली होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच माहोल बनला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर प्रथमच आज विधानभवनात महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीकेचा भडिमार केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT