Raj, Uddhav, and Sharad Pawar Lead Protest Over Electoral Mismanagement Saam
मुंबई/पुणे

कुणाची भाषणं होणार? कोण कसं घटनास्थळी पोहोचणार? सत्याच्या मोर्चाबाबत मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून माहिती

Raj, Uddhav, and Sharad Pawar Lead Protest Over Electoral Mismanagement: मतचोरीविरोधात महाविकास आघाडी अन् मनसेकडून सत्याचा मोर्चा. राज ठाकरे घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना.

Bhagyashree Kamble

  • मतचोरीविरोधात मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’.

  • महाविकास आघाडी आणि मनसेकडून मोर्चा.

  • बाळा नांदगावकरांकडून मोर्चेबाबत अपडेट.

मतदारयाद्यांमधील गोंधळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून 'सत्याचा मोर्चा' निघणार आहे. या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मतदारयादीतील घोळ, मतचोरी उघड करण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे.

मुख्य म्हणजे जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी आणि असत्य सर्वांसमोर उघड करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्याचा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल. ते मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारा थांबणार आहे. या मोर्चेसाठी राज ठाकरे शिवतीर्थावरून रवाना झाले आहेत. दादर रेल्वे स्टेशनवरून चर्चेगेट लोकल पकडून त्यांनी प्रवास केला.

दरम्यान, सत्याचा मोर्चेसाठी पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. विनापरवानही महाविकास आघाडी आणि मोर्चेकडून मोर्चा काढल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांच्या संभाव्य कारवाईवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी कारवाई केली तर, आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत, असं नांदगावकर म्हणाले.

'मोर्चेसाठी परवानगी मिळाली नाही तरी, आम्ही मोर्चा काढणारच. पोलिसांनी कारवाई केली तरी आम्ही समोरे जाणार', असं बाळा नांदगावकर म्हणाले. 'पोलिसांसोबत आमची बैठक झाली होती. पोलिसांनी सकारात्मकता दर्शवली. परंतु, या मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही. पण कारवाई झाली तर, आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत', असं नांदगावकरांनी स्पष्ट केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पावसाळी वातावरण आहे. पाऊस झाला तरी मोर्चा होणार, अशी माहिती नेत्यांनी दिली. या मोर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन या प्रमुख नेत्यांची भाषणं होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

SCROLL FOR NEXT