Mahavikas Aaghadi Press Conference:  Saamtv
मुंबई/पुणे

MVA Press Conference: परतीचे दार बंद! सोडून गेलेल्यांना पुन्हा घेणार का? शरद पवार, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात सांगितलं!

Mahavikas Aaghadi Press Conference: विधानसभा निवडणुकांबाबत बोलण्यासाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १५ जून २०२४

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुका होताच उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची साथ सोडून गेलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वाचे विधान करत बंडखोर नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या यशानंतर उत्साह वाढलेल्या महाविकास आघाडीने आज विधानसभा निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. आज विधानसभा निवडणुकांबाबत बोलण्यासाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला.

"मला समजा मोदींसोबत जायचं तर मी या सगळ्या नेत्यांच्या मध्ये बसून सांगेन. जे लोक सोडून गेले त्यांना परत घेणार नाही . बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी? हे गाणं मला आठवते जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना जास्त जागा मिळतात. पण त्या पारिजातला खत पाणी घालत राहणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही," असे म्हणत शरद पवार यांनीही ठाकरेंच्या सुरात सूर मिसळले.

शरद पवारांचा मोदींना टोला..

"मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या, तिथं आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला. देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ सभा झाल्या एक रोड शो झाला, तिथे आमचे उमेदवारला फायदा झाला. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या त्या आमच्या फायद्याच्या ठरतील," असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT