बीड, ता. १५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले झाल्याने अनेक अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. याबाबत बोलताना ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते भाई दीपक केदार यांनी धक्कादायक विधान केले आहे.
काय म्हणाले भाई केदार?
"महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे धोरण विघटनवादी संघटनेकडून सुरू आहे. आणि तेच वातावरण आज बीड जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे, त्यामुळं आपल्या कुटुंबातील महिलांची काळजी घ्या, सुरक्षा करा," असं म्हणत ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते भाई दीपक केदार यांनी मोठे विधान केलं आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच "पंकजा मुंडे यांचा पराभव हा कोणत्या जातीमुळे किंवा जातीवादामुळे झाला नाही. तर तो संविधान विरोधी भाजपची भूमिका आणि 400 सो पार च्या भूमिकेमुळे झाला आहे. त्या जरा अपक्ष उभ्या राहिल्या असत्या तर त्या निवडून आल्या असत्या," असे देखील दीपक केदार यांनी म्हटल आहे
विधानसभा लढवण्याचीही घोषणा!
"महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय हा ऑल इंडिया पँथर सेनेमुळे झाला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने भाजपविरोधी भूमिका घेतली, संविधान बचावचा नारा दिला आणि त्यामुळे हा विजय झाला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आम्ही बीड जिल्ह्यातील केज विधानसभा, त्याचबरोबर इतर ठिकाणच्या ज्या आरक्षित विधानसभा आहेत. त्या संदर्भात महाविकास आघाडी सोबत चर्चा करणार आहोत. आम्ही देखील विधानसभा लढणार आहोत," असेही ये यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.