Maharashtra Weather Updates IMD Predict Heavy Rain Next 48 Hours in Marathwada vidarbha Many Districts Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert: महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत धुव्वांधार पाऊस होणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

Maharashtra Weather Alert: त्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Updates: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात दहीहंडीच्या मुहुर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी (७ सप्टेंबर) सकाळपासूनच मुंबई, पुण्यासह मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. (Latest Marathi News)

पावसामुळे खरीप हंगामातील शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईसह, पुण्यातही (Mumbai-Pune) आज मुसळधार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात हळुहळू पावसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

त्यातच नैऋत्य आणि पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते 55 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस कोसळणार

दरम्यान, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण (Weather Updates) निर्माण झालं असून आज बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट (Maharashtra Rain) देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT