Heat Wave In Pune  Saam TV
मुंबई/पुणे

Pune October Heat: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळे पुणेकर घामाघूम

Pune Weather Update: पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा चटका वाढला वाढत असून शहरात दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्यावर नोंदवले जात आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Maharashtra Weather Update:

देशभरासह राज्यात परतीच्या पावसाला (Maharashtra Rain) सुरूवात झाली आहे. गणेशोत्सव काळात धो- धो कोसळलेला वरुणराजा आता गायब झाला आहे. पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा चटका वाढला असून 'ऑक्टोबर हिट'मुळे (October Heat) पुणेकर घामाघूम झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेशोत्सव (Ganapati Festival) काळात धो- धो कोसळलेला पाऊस लवकरच निरोप घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशभरासह काही राज्यांमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा तडाका जाणवू लागला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता वाढू लागली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान चांगलेच वाढत असून उष्णतेने पुणेकर (Pune) घामाघूम झाले आहेत. पुणे शहरात दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्यावर नोंदवले जात आहे.

मुंबई (Mumbai) आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT