KDMC News: अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासू; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांना दम

Kalyan News : अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासू; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांना दम
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्याबाबत शिवसेना शिंदे गट आक्रमक झाले आहे. आज डोंबिवलीतील रस्त्याची शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत येत्या दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही; तर तोंडाला काळे फासू असा सज्जड दम  शिवसेना पदाधिकाऱ्यांनी (KDMC) अधिकाऱ्यांना दिला. या पाहणी दौऱ्यादरम्यान केडीएमसी शहर अभियंत्यांनी देखील कार्यकारी अभियंता तंबी दिली. (Maharashtra News)

KDMC News
Nandurbar News : धनगर आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाची धग ग्रामीण भागातही; शेकडो ग्रामस्थांकडून निषेध रॅली

कल्याण- डोंबिवली शहरात रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीने या खड्ड्यांबाबत आंदोलन केली आहेत. नागरिकांनी देखील तक्रारी केल्या. मात्र पावसाचे कारण देत महापालिकेकडून हे काम संथगतीने सुरू होते. आता आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिल्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता शहरात धुळीचं साम्राज्य पसरले, 

KDMC News
Tomato Price: विक्रीला आणलेले टोमॅटो वाटले मोफत; भाव नसल्याने शेतकरी संतप्त

रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आता सत्ताधारी शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झालाय. आज शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह (Kalyan) कल्याण डोंबिवली महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे व संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच येत्या दोन दिवसात जर खड्डे बुजवले नाही; तर तुमच्या तोंडाला काळे फासू तुम्हाला केबिनमध्ये बसून देणार नाही असा इशाराच अधिकाऱ्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com